स्विस बँकेत खातं असणाऱ्या घोटाळेबाजाला पहिल्यांदाच शिक्षा...वाचा कोण आहे तो बहाद्दर ???

स्विस बँकेत खाते असणाऱ्या अनेकांची नावे आत्ता पर्यंत उघडकीस आली पण त्यातील किती जणांना शिक्षा झाली बरं ? काही नावे सांगू शकता का मंडळी ?....लगेच गुगल वर जाऊ नका राव. अशी एकही व्यक्ती आत्ता पर्यंत तरी नव्हती कारण नाव जरी समोर आल तरी त्या व्यक्ती विरोधात पुरावे कधी मिळालेच नाहीत. पण शिक्षा होणाऱ्यांच्या रिकाम्या यादीचं उद्घाटन आता एकाने केलंय.

पंजाब ज्वेलर्स या देहरादूनच्या प्रसिद्ध ज्वेलरी शॉपचा मालक ‘राजू वर्मा’ असं या घोटाळेबाजाचं नाव आहे.

तर झालं असं की इनकम टॅक्सच्या छाप्यात राजू वर्माला त्याच्या मिळकतीतील ९२ लाखांचा हिशोब देता आला नाही. तपासणीत समजलं की हे पैसे त्याने स्विस बँकेत जमा केले होते. त्याचबरोबर छाप्यामध्ये राजूने आणखीही माया जमवल्याचं उघड झालं. यावरून इनकम टॅक्सवाल्यांनी राजू वर्मावर तब्बल 16 गुन्हे दाखल केले आणि या सर्व गुन्ह्यात राजू वर्मासहित एकूण १६ जणं दोषी निघाले.

राजू वर्माला कोर्टाने २ वर्षाची शिक्षा आणि २५००० हजाराचा दंड ठोठावला आहे.

तर शेवटी प्रश्न असा कि हा राजू वर्मा तर काळ्या पैश्याच्या समुद्रातला एक छोटासा मासा आहे मग उरलेले मोठे मासे गळाला कधी लागणार ब्वा ?

सबस्क्राईब करा

* indicates required