दिल्ली म्हणजे बलात्काराची राजधानी ? या रिक्षाचालकाने केलेली कामगिरी हा कलंक नक्कीच पुसेल !!

निर्भया प्रकरणाने दिल्लीचं नाव बदनाम केलं आहे. निर्भया नंतरही दिल्ली मधल्या बलात्काराच्या घटना कमी झाल्या नाहीत हे दुर्दैवच म्हणावं लागेल. असं असतानाही काही मोजकी माणसं आपल्या परीने परिस्थितीत सुधार आणण्यासाठी झटत आहेत. दिल्ली मध्ये एका मुलीला असाच एक रिक्षाचालक भेटला.

स्रोत

नेहा दासने फेसबुक पोस्ट मधून आपला अनुभव शेअर केला. गुरुवारच्या रात्री ती दिल्ली भागात रिक्षाची वाट बघत होती. प्रवीण रंजन हा रिक्षाचालक तिथे आला. नेहाने जेव्हा पैसे देऊ केले तेव्हा त्याने ते घेतले नाहीत. त्यावर तो म्हणाला की. “महिलांची सुरक्षा सर्वात जास्त महत्वाची आहे त्यामुळे मी रात्री उशिरा महिलांकडून पैसे घेत नाही.”

स्रोत

मंडळी, म्हटलं तर ही लहानशी गोष्ट आहे पण तेवढीच महत्वाची आहे. प्रवीण रंजनच्या या कामगिरीचं सोशल मिडीयावर कौतुक होत आहे. ४०० पेक्षा जास्त लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मंडळी, आपल्या महाराष्ट्रातही अशा व्यक्तींची कमी नाही. तुमच्या ओळखीत जर कोणी असेल तर आम्हाला नक्की कळवा. आम्ही त्यांच्याबद्दल नक्की लिहू !!