जेवण आवडलं नाही म्हणून वऱ्हाडींनी घातला राडा....लग्न करणार असाल तर आधी हे वाचा !!

मंडळी, लग्न म्हटलं की जेवण आलंच. भारतात तर लग्नातल्या जेवणाला अत्यंत महत्व आहे. माणसं घरी जाताना ‘जेवण तरी नीट ठेवायचं’ अशा पद्धतीची वाक्य म्हणतच जातात. याच जेवणावरून अनेक भांडणं झाली आहेत. साधा रसगुल्ला मिळाला नाही म्हणून लोकांनी लग्न मोडली आहेत. काही दिवसापूर्वीच अहमदाबादच्या एका लग्नात जेवणावरून झालेलं भांडण एवढं विकोपाला गेलं की नवरा नवरीने मंडपातच वकिलांना बोलावून घटस्फोट घेतला.
आज जी बातमी तुम्ही वाचणार आहात त्यात जेवणाने दंगल घडवून आणली आहे. पहा नक्की काय घडलंय !!
दिल्लीच्या जनकपुरी भागातली ही घटना. लग्न वगैरे सगळं नीट पार पडलं होतं, पण वऱ्हाडी मंडळींना जेवण काही आवडलं नाही. यात भर पडली ती केटरिंगवाल्याच्या खराब सेवेची. अशावेळी साधारण माणूस मॅनेजरला तक्रार करेल, पण या घटनेत वऱ्हाडी मंडळींनी हाणामारीला सुरुवात केली. तिथे नेमकं काय घडत हे या व्हिडीओ मध्ये पाहा.
मुलीकडचे आणि मुलाकडचे असे सगळेच खांद्याला खांदा लावून या हाणामारीत सामील झाले होते. तिथल्या प्रत्येक गोष्टीची मोडतोड करण्यात आली आहे. एक वेटर तर हात जोडून माफी मागतोय. हा सगळा राडा संपल्यावर तिथली परिस्थिती काय होती हे या दुसऱ्या व्हिडीओ मध्ये पाहा.
मंडळी, हे सगळं झाल्यावर पोलीस आले आणि त्यांनी काही लोकांना ताब्यातही घेतलं. पण तोवर जो सत्यानाश व्हायचा होता तो झालाच.
मंडळी, तुमच्याकडे आहे का लग्नातला असाच अतरंगी किस्सा ? असेल तर नक्की शेअर करा !!