computer

चक्क एका झोपडपट्टीने ताजमहालला मागे टाकलंय...कुठे आहे ही झोपडपट्टी??

साधारणपणे देशातल्या प्राचीन, ऐतिहासिक किंवा एकदम मॉडर्न वास्तू पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असतात, पण आपल्या भारताचा पॅटर्नच वेगळा आहे ना भाऊ. भारतात चक्क एका झोपडपट्टीने ताजमहालच्या प्रसिद्धीला धक्का दिलाय. कुठे आहे ही झोपडपट्टी आणि या झोपडपट्टीने ताजमहालला कसं हरवलं? चला जाणून घेऊया.

मंडळी, नुकतीच आशिया खंडातल्या पर्यटकांच्या पसंतीच्या १० प्रेक्षणीय स्थळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत धारावी झोपडपट्टी १० व्या क्रमांकावर आहे. ताजमहाल तर या लिस्टमध्येच नाही. ताजमहालचं सोडा, पण या लिस्टमध्ये भारतातल्या इतर कोणत्याही ठिकाणाचा समावेश नाहीय.

यावरून काही अनुमान लावता येऊ शकतात. पर्यटकांना आता प्रेक्षणीय स्थळं बघण्यात तेवढा रस राहिलेला नाही. स्लामडॉग मिलीनेयर पाहून लोकांना धारावीचं आकर्षण वाटतंय. त्यांना लोकांना जवळून पाहायला आवडतंय. याच कारणाने धारावीने बाजी मारली आहे.

तर मंडळी, काय म्हणाल धारवीने केलेल्या नवीन विक्रमाबद्दल ??

सबस्क्राईब करा

* indicates required