computer

'शाओमी', 'रेडमी' आणि 'एमआय'मध्ये काय फरक आहे?

मंडळी अनेकांना वाटते की xiomi, redmi आणि mi एकच आहेत. पण ते पूर्ण खरे नाही. श्याओमी खरेतर एक सॉफ्टवेयर कंपनी होती. नंतर त्यांनी स्मार्टफोन बनवायला सुरवात केली. आल्या आल्या त्यांनी मार्केटमध्ये धुमाकुळ घालायला सुरवात केली. त्यांचे फोन प्रचंड हिट झाले हे तुम्ही जाणताच!! 

शाओमी, रेडमी आणि एमआय मध्ये फरक काय?

तर मंडळी, शाओमी ही मुळ कंपनी आहे. या चायनीज कंपनीचे रेडमी आणि एमआय हे  सीरीज फोन आहेत. मग रेडमी आणि एमआयमध्ये काय फरक आहे? तसे पाहायला गेले तर जेवढा फरक सॅमसंग गॅलेक्सीच्या नोट सिरीज आणि एस सिरीजमध्ये जेवढा फरक आहे तेवढाच फरक रेडमी आणि एमआयमध्ये आहे. 

एमआयचे फोन्स हे हेवी युजर्ससाठी आहेत. खास करून त्यांच्यासाठीच या सिरीजची निर्मिती करण्यात आली आहे. या सिरीजद्वारे हेवी युजर्सना चांगला स्पीड आणि प्रोसेसिंग सर्व्हिस देण्यात येते. शाओमी पोर्टफोलिओमध्ये एमआयचे फोन हायपर एन्ड स्मार्टफोन आहेत म्हणून एमआयचे फ़ोन हायएन्ड स्मार्टफोन म्हणून ओळखले जातात. 

रेडमीचे फोन पारंपरिक वापरासाठी बनविण्यात आले आहेत. ज्यांना हेवी किंवा रफ फोन वापरायची सवय आहे त्यांना रेडमीचे फोन वापरण्यात अडचण येण्याची शक्यता असते.  एमआयची मेटल क्वालिटी स्ट्राँग असते. त्यांची डिजाईन मेटलबेस केलेली असते. त्यांचा सॉफ्टवेअर सुद्धा रेडमीच्या फोन्सच्या मानाने फास्ट असतो. म्हणून एमआयचे फोन लवकर हँग होत नाहीत. एवढाच काय तो त्यांच्यात फरक आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required