डॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर ???

दारू शरीरासाठी वाईट असते असं म्हणतात, पण एका व्हियेतनामी व्यक्तीसाठी दारू ही एकाच वेळी विष आणि संजीवनी ठरली आहे. अल्कोहोल विषबाधेपासून वाचवण्यासाठी डॉक्टरांनी व्हिएतनामी व्यक्तीच्या पोटात तब्बल १५ कॅन बियर ओतली आहे. धक्का बसला ना ? चला तर जाणून घेऊ या मद्यापासून वाचवण्यासाठी मद्याचाच वापर का करण्यात आला ते.
मंडळी, अल्कोहोलचे दोन प्रकार असतात इथेनॉल आणि मेथनॉल. "ह्युं वान न्हात" हा व्हियेतनामी व्यक्ती जेव्हा डॉक्टरांकडे आला तेव्हा त्याच्या पोटात मेथनॉलचं प्रमाण सामन्यापेक्षा तब्बल १,११९ पटीने वाढलं होतं. मग यावर उपाय म्हणून दुसऱ्या एका अल्कोहोलचा वापर करण्यात आला.
बियर मध्ये इथेनॉल असतं. आपलं शरीर हे इथेनॉल मेथनॉलपेक्षा लवकर शोषून घेतं. त्यामुळे मेथनॉल शरीरात पसरण्यास अडथळा निर्माण होतो. हीच बाब लक्षात घेऊन डॉक्टरांनी डायलिसीस करताना बियरचा वापर केला आहे. ह्युं वान न्हातच्या शरीरात प्रत्येक तासाला एक कॅन या प्रकारे १५ कॅन बियर टाकण्यात आली.
हा उपाय चांगलाच गुणकारी ठरला आहे. ह्युं वान न्हात ला ३ आठवड्यांनी डिस्चार्ज मिळाला. आता तो घरीच उपचार घेतोय.
मंडळी, दारूनेच दारूचा नाश करण्याची ही बहुतेक पहिलीच वेळ असावी !!