computer

फोटोतल्या पिक्सेल्स इतकी त्या प्राण्याची संख्या आहे....काय आहे ही भन्नाट कल्पना?

हवामानातील बदल म्हणा किंवा जंगलतोड म्हणा, प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर पोचले आहेत. सप्टेंबरमध्ये आलेल्या अहवालाने भारतीय चित्ता नामशेष झाल्याचं जाहीर केलंय.

२००८ साली वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड जपानने एका अनोख्या पद्धतीने या जागतिक समस्येकडे लोकांच लक्ष वेधून घेतलं होतं. त्यांनी एक मोहीम चालवली होती. त्याचं नाव होतं Pixel campaign. एखाद्या प्राणी प्रजातीची जगभर जेवढी संख्या उरली असेल तेवढी त्या फोटोत पिक्सेल्स असतील अशी ही कल्पना होती. उदाहरणासाठी हा फोटो पाहा.

टोक्योच्या Hakuhodo C&D या कंपनीची ही कल्पना होती. या कल्पनेचा आधार घेऊन JJSmooth44 या प्रोग्रामरने नवीन फोटो तयार केले आहेत. या नवीन फोटोंमध्ये प्राण्यांची सध्याची संख्या दाखवण्यात आली आहे.

१. आफ्रिकन रानटी कुत्रे

आफ्रिकन वाइल्ड डॉगचा फोटो म्हणावा तेवढा धूसर नाही. त्याचं कारण म्हणजे या प्राण्याची लोकसंख्या जवळजवळ ३००० ते ५००० एवढी आहे. ही संख्या फार मोठी नसली तरी धोकादायक परिस्थितीपर्यंत पोचलेलो नाही असं म्हणता येईल.

२. अमूर बिबट्या.

अमूर बिबट्या रशियाच्या दक्षिण भागात आढळतो. फोटोत दिसत दाखवल्याप्रमाणे त्याची संख्या आता केवळ ६० एवढी उरली आहे. ही जगभरातली एकूण आकडेवारी आहे. अमूर बिबट्या हा जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

अमूर बिबट्याप्रमाणेच अमूर वाघाची संख्या देखील आता कमी झालेली आहे. केवळ ४५० अमूर वाघ अस्तित्वात आहेत.

३. ब्लॅक फुटेड फेरेट.

उत्तर अमेरिकेत आढळणाऱ्या ब्लॅक फुटेड फेरेट प्राण्याची संख्या देखील फारच कमी आहे. त्याची एकूण संख्या केवळ ३०० एवढीच आहे. एक चांगली गोष्ट म्हणजे ब्लॅक फुटेड फेरेटची संख्या मागच्या काही वर्षात वाढलेली आहे.

४. जावन गेंडा

जावा आणि सुमात्रा येथे आढळणारा जावन गेंडा हा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जगभरात केवळ ६० जावन गेंडे शिल्लक आहेत. एकेकाळी मोठ्याप्रमाणात शिकार झाल्याने हा प्राणी आता पृथ्वीवरून नष्ट होईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

५. पट्टेरी वाघ (रोयाल बंगाल टायगर)

या यादीत भारतीय प्राणी देखील आहे. बंगालचा प्रसिद्ध पट्टेरी वाघाची संख्या जगभरात २५०० एवढीच आहे.

 

या यादीत असलेले आणखी प्राणी बघायचे असतील तर या लिंकवर क्लिक करा.

https://imgur.com/gallery/NVNsyel

 

आणखी वाचा : 

भारतातल्या या ३ प्राण्यांच्या जाती लुप्त झाल्या आणि आपल्याला पत्ता देखील लागला नाही !!

सबस्क्राईब करा

* indicates required