computer

भारतातल्या या ३ प्राण्यांच्या जाती लुप्त झाल्या आणि आपल्याला पत्ता देखील लागला नाही !!

मंडळी, पृथ्वीची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. हवामान बदलासोबतच इतर बाजूने देखील निसर्गाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतंय. याची झळ आता भारताला सुद्धा बसू लागली आहे. भारतातील ३ प्राण्यांच्या जाती नष्ट झाल्याच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालंय.

‘युनाइटेड नेशन्स कॉनव्हेन्शन टू कॉम्बेट डेझर्टिफिकेशन’ या अधिवेशनात मांडण्यात आलेल्या संशोधनात भारतातील ३ लुप्त झालेल्या प्राण्यांच्या जातींची नावे आहेत. भारतीय चित्ता, गुलाबी डोक्याचे बदक, माळढोक पक्षी हे ते तीन प्राणी. या प्राणी प्रजाती नष्ट होण्याचं कारण आहे जंगलतोड आणि वाळवंटीकरण

भारतीय प्राणी सर्वेक्षणाचे कैलाशचंद्र यांनी सांगितल्याप्रमाणे ‘गेल्या १०० वर्षातील बदलांचा हा परिणाम आहे.’ वृक्षतोड आणि वाळवंटीकरणामुळे भारतातील प्राणी लुप्त होण्याच्या दिशेने वाटचाल करतायत. हे ३ तर फक्त सुरुवात म्हणायला हवी.

वृक्षतोड तर तुम्हाला माहित असेलच पण हे वाळवंटीकरण काय प्रकार आहे ते समजून घेऊया.

मोठ्याप्रमाणातील किटकनाशकं, शहरीकरण, हवामान बदल तसेच रासायनिक कचरा निर्माण करणाऱ्या कंपन्या, या कारणांनी जमिनीचा कस जाऊन जमीन ओस पडू लागते. या प्रक्रियेला वाळवंटीकरण म्हणतात. वाळवंटीकरणामुळे फक्त प्राण्यांवर परिणाम होत नाही, तर त्याचा संपूर्ण अन्न साखळीवर परिणाम होतो.

याला हातभार लावण्यासाठीच की काय म्हणून वृक्षतोडही मोठ्या प्रमाणावर होत आहे. वृक्षतोड, प्रमाणापेक्षा जास्त लागवड, मातीची धूप यामुळे भारतातल्या तब्बल ३० टक्के जमिनीचं नुकसान झालं आहे.

मंडळी, भारतातच नाही तर जगभरात ही समस्या आहे. वेळीच जाग आली नाही तर आज ३, उद्या १० अशा पद्धतीने प्राण्यांच्या जाती नष्ट होतील. शिवाय संपूर्ण अन्नसाखळी कोलमडून पडेल.

 

आणखी वाचा :

जागतिक प्राणी दिन : लुप्त झालेले १० अनोखे प्राणी !!

सबस्क्राईब करा

* indicates required