computer

मलेशियातले लोक ग्रहणाच्यावेळी रस्त्यावर अंडं का ठेवत होते ? ग्रहणाचा आणि अंड्याचा काय संबंध आहे ?

काल २०१९ चं शेवटचं ग्रहण होतं. भारत आणि आशियाच्या इतर भागातले लोक ग्रहण बघण्याची धडपडत होते. मध्येच ढग आल्याने निराशाही  झाली, पण शेवटी ग्रहण दिसलंच. एकीकडे हा उत्साह असताना तर मलेशियात भलतंच चित्र पाहायला मिळत होतं. ग्रहण असल्याने तिथले लोक रस्त्यात अंडी ठेवून अंडं स्थिर राहतंय का हे पाहत होते. अंड्याचा आणि ग्रहणाचा संबंध काय असा प्रश्न पडला ना ? चला तर समजून घेऊया.

एका जुन्या वैज्ञानिक सिद्धांतानुसार चंद्राने सूर्याला झाकल्यावर वसंतसंपातामुळे अंडं पडणार नाही. याला जोडूनच एक मिथक सांगितलं जातं, ते असं की सूर्यग्रहणाच्यावेळी सूर्य आणि चंद्र हे पृथ्वीपासून समान अंतरावर असतात म्हणून अंडं पडत नाही. हे अर्थातच खोटं आहे. सूर्य जर चंद्राइतकाच पृथ्वीच्या जवळ आला तर माणूस अंडं उभं करण्यासाठी जिवंतच राहणार नाही.

खरं तर वसंतसंपाताच्यावेळी गुरुत्वाकर्षणात कसलाही बदल घडत नाही. तुम्ही जर सराव केला तर वर्षाच्या कोणत्याही दिवशी अंडं उभं करू शकतं.

विज्ञान  काहीही म्हणत असलं तरी मलेशिया आणि आणि इंडोनेशियातील लोकांनी या गोष्टीला भलतंच मनावर घेतलं होतं. काल दिवसभर रस्त्यावर ठेवलेल्या अंड्यांची चर्चा होती. तुम्हाला जर वाटत असेल की हा प्रकार फक्त तिथेच होतो तर तसं नाही. आपल्याकडे पण लोक ग्रहणाच्यावेळी मुसळ उभी करण्याचा प्रयत्न करतात.

तर मंडळी, या गोष्टीबद्दल तुम्हाला माहित होतं का ? ग्रहणाच्यावेळी तुमच्याकडे काय काय करतात ?

सबस्क्राईब करा

* indicates required