व्हिडीओ ऑफ दि डे : आंबा चोरण्यासाठी या हत्तीने काय केलं पाहा...

हत्ती हा चपळतेसाठी ओळखला जात नाही. तो शांत आणि मंद गतीने वागणारा प्राणी असतो. पण एक हत्ती आहे जो आपल्या स्वभावाच्या अगदी उलट वागला आहे. हा व्हिडीओ पाहा.
हा व्हिडीओ झाम्बियाच्या साऊथ लुआंग्वा राष्ट्रीय उद्यानातला आहे. या भागातील एमफ्यूवे लॉज मधले सर्व पर्यटक संध्याकाळच्या सफारीला गेले होते. आसपास कोणी नाही बघून या हत्तीने लॉजची भिंत ओलांडली. भिंत ओलांडण्यापूर्वी त्याने माणसाप्रमाणे भिंतीच्या उंचीचा अंदाज घेतला, मग उजवा पाय आधी टाकून डावा पाय वाकवला आणि भिंत ओलांडली. हत्ती अशा पराक्रमासाठी नक्कीच ओळखले जात नाहीत, पण या हत्तीने आश्चर्याचा धक्का दिला आहे.
हत्तीने भिंत का ओलांडली ?
एमफ्यूवे लॉजचे व्यवस्थापक अॅडी हॉग हे त्यावेळी तिथे उपस्थित होते. त्यांनीच हा व्हिडीओ तयार केला आहे. त्यांच्या मताप्रमाणे हत्तीला नक्कीच भूक लागली असणार. त्यामुळे तो लॉजच्या आत असलेल्या आंब्यांच्या शोधात आला. पण त्याची वेळ चुकली होती. आंब्यांचा बहर गेलेला आहे.
एमफ्यूवे लॉजच्या आत हत्तींचा कळप दरवर्षी येतो. त्यांचा येण्याचा मार्गही ठरलेला आहे, पण आजवर कोणीही भिंत ओलांडून आलं नव्हतं.
तर मंडळी, काय म्हणाल या चपळ हत्तीबद्दल ?