computer

श्रीलंकेतल्या हत्तीच्या अत्याचाराचा काय किस्सा आहे? भारतात असं घडू नये म्हणून काय कायदा आहे?

प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या क्रूर वागणुकीचे अनेक प्रकार घडत असतात. नुकताच श्रीलंकेच्या हत्तीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हत्तीच्या पाठीवर बसलेला माहूत हत्तीला मारत आहे आणि हत्ती अक्षरशः जीवाच्या आकांताने रडतोय.

स्वतःच्या जबाबदारीवर हा व्हिडीओ पाहा.

व्हिडीओतील हत्ती रडतोय पण त्याचा विचार न करता माहूत त्याच्या डोक्यावर मारत आहे.  हत्तीला हे सहन न होऊन तो माहुताला पाठीवरून ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी तर हत्ती पाण्यात कोसळतो.

हा व्हिडीओ श्रीलंकेच्या सासनवर्देना पिरीवेना या बौद्ध मंदिरातील आहे. या हत्तीचं नाव ‘विश्वा’ आहे. विश्वा सोबत जसं वर्तन केलं जात आहे ती काही नवीन बाब नाही. श्रीलंकेतील पाळीव हत्तींना संभाळण्याची ही नेहमीची पद्धत आहे. अशा क्रूर वागणुकीमुळे हत्तींचा मृत्यूही होतो. या विरोधात अनेकदा बोललं गेलं आहे पण परिस्थितीत बदल झालेला नाही.

भारतीय कायदा काय म्हणतो?

भारतात प्राण्यांच्या संरक्षणासाठी 'प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा’ आहे. या कायद्यानुसार पाळीव प्राण्याला तो सुदृढ असूनही कोणत्याही कारणाशिवाय घरातून काढून टाकणे हा गुन्हा आहे. तसेच कोणत्याही प्रकारे प्राण्यांना मारणे, त्यांच्याशी क्रूर वर्तणूक करणे हा गुन्हा आहे. मनोरंजनासाठी प्राण्यांना पिंजऱ्यात बंद करून ठेवणे बेकायदेशीर आहे. घोड्यांना दिल्याजाणाऱ्या क्रूर वागणुकीमुळे भारतात घोडागाडीवर बंद घालण्यात आली आहे. मांसासाठी उंट विकणे हाही कायदेशीर गुन्हा आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required