इंग्लंडच्या राणीला चक्क 'या' कामासाठी लेखक हवाय...

ऐका हो ऐका..  राणीला हवाय एक लेखक!! लेखक!! लेखक !!

भाऊ, आजचा काळ “थोबाड पुस्तक” (फेसबुक), “कसं काय मग ?” (व्हॉट्सअॅप) चा असला तरी आपली राणी आज्जी आजही लोकांना उत्तरादाखल ‘पत्र’ पाठवते बरं का. आता ती आहे इंग्लंडची राणी. तिला अनेक पत्रं येतात. या पत्रांच्या ढिगाऱ्यांना स्वतः उत्तर द्यायचं म्हटलं तर ते तिला शक्य नाही. आणि म्हणून तिच्यावतीने पत्र लिहू शकणारा माणूस सध्या आज्जी शोधत आहे.

इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की पत्र फक्त राणीच्यावतीने लिहायची आहेत, एवढंच या कामाचं स्वरूप नाही. पत्रं कोणाकडून आली आहेत आणि त्याला उत्तर देताना त्याची लेखन शैली काय असेल याकडेही त्या व्यक्तीने लक्ष दिलं पाहिजे. म्हणून तर त्यांना ‘लेखक’ हवा आहे. कुणा येऱ्यागबाळ्याचं काम नाही हे.

स्रोत

आलेल्या पत्रांना अस्खलित इंग्रजीत योग्यरित्या उत्तर लिहिण्याचं काम या लेखकाला करावं लागेल. यासाठी इंग्रजीवर भक्कम पकड हवी. राणीच्या वतीने लिहिताना पत्रं समजून घेऊन ती लिहावी लागतील. यात स्वतः प्रसंगावधान बाळगून योग्य अशी कामं करावी लागतील. या कामात ताण आहे, पण डोक्यात शांतता हवी. शिवाय ही पत्रं संख्येने जास्त असल्याने त्या व्यक्तीला पत्रं कमी वेळेत वाचता यावी. याबद्दलची सगळी माहिती रॉयल वेबसाईटवर दिली आहे.

आता प्रश्न पडतो, "हे सगळं खरं.. पण पगार किती"?

तर या लेखकाला मिळणार आहेत वर्षाला तब्बल १७ लाख रुपये.

मंडळी कोणी आहे का तुमच्या ओळखीत जो आपल्या राणी आज्जीकडे नोकरी करू शकेल? असेल तर ही पोस्ट शेअर करा ना भाऊ.

सबस्क्राईब करा

* indicates required