ATM मधून फाटकी नोट आली तर काय कराल ?...बघा बरं पटपट !!

आपली अपेक्षा असते की ATM मधून कोरी करकरीत नोट निघेल, पण अनेकदा फाटकी, कुरतडलेली आणि मळकी नोट बाहेर पडते. अशावेळी टाळकं सटकणारच ना भाऊ!! मग आपण काय करतो? नोटांच्या बंडलमध्ये अगदी मधोमध ही नोट ठेवून टाकतो. मग टॅक्सीवाला, किरणा मालाचं दुकान, रिक्षावाला, इत्यादी ठिकाणी ती नोट गुपचूप खपवतो. पण हे लोक पण हुशार. “ये नही चलेगा”  “दुसरी नोट द्या.” असं म्हणत ते आपली नोट निवडून आपल्याला परत करतात.

अशावेळेस काय करायचं ? आपल्या फाटक्या नोटेला वाली कोण ? ATM मधून अशी नोट निघाली तर काय करावं ? चला आज याबद्दल जाणून घेऊया.

स्रोत

फाटक्या तुटक्या नोटांबद्दल थेट ‘रिझर्व बँक ऑफ इंडियाने’ असे आदेश दिले आहेत की जर कोणत्या ग्राहकाने फाटकी नोट आणली तर ती स्वीकारण्याची किंवा बदलण्याची जबाबदारी बँकेवर आहे. याबरोबरच ज्या नोटांवर काही लिहिलेलं आहे अशा नोटासुद्धा बँकेने स्वीकारल्या पाहिजेत. महत्वाचं म्हणजे ATM मधून निघणाऱ्या खराब नोटांची जबाबदारी ही सर्वस्वी बँकेची असेल असं RBI ने म्हटलंय. म्हणजे तुम्ही या प्रकारच्या नोटा बँकेत जाऊन जमा करू शकता.

या संदर्भात काही महत्वाच्या घडामोडी : 

स्रोत

१९९९ – RBI ने आदेशाप्रमाणे नोटांवर काहीही लिहिलेलं नसावं. अश्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत.

मार्च २०१३ – RBI सांगितलं की सर्व प्रकारच्या खराब आणि फाटक्या नोटा बँकांनी बदलून दिल्या पाहिजेत. नोटा लगेचच बदलता येत नसतील तर काही कालावधीने बदलून दिल्या पाहिजेत.

जुलै २०१३ – नोटांवर जर कोणत्या राजकीय पक्षाबद्दल किंवा आणखी कोणताही मजकूर लिहिलेला असेल तर ती नोट स्वीकारली जाणार नाही.

२०१४ – RBI ने आदेश दिला की लिहिलेल्या नोटा स्वीकारल्या जातील.

एप्रिल २०१७ – RBI ने आदेश दिला की कोणत्याही प्रकारची लिहिलेली किंवा फाटलेली नोट बँक नाकारू शकत नाही.

 

एकंदरीत काय तर ATM मधून फाटकी तुटकी नोट बाहेर पडली तर ती नोट घेऊन सरळ बँकेत जायचं आणि नोट बदलून घ्यायची. थेट RBI चा आदेशच आहे तसा राव !!

सबस्क्राईब करा

* indicates required