computer

आज रात्री चक्क स्ट्रॉबेरी कलरचा चंद्र दिसणार आहे. कशामुळे चंद्राचा रंग बदलणार आहे ते जाणून घ्या !!

मंडळी, चांदोबाला काही आपण सोडत नाही. लहानपणी "चांदोबा चांदोबा भागलास का" आणि मोठेपणी "तेरे लिए चांद तोड़ के ले आऊंगा" असे सगळे आशिक सांगत असतात. याचे कारण चांदोबा आहेच तेवढा सुंदर मंडळी!! प्रतिपदेचा, चतुर्थीचा, पौर्णिमेचा अशी चंद्राची सगळी रूपे मोहकच वाटतात.  तसा पूर्ण चंद्र आपल्याला फक्त महिन्यातुन एकदाच पाहता येतो. वरुन त्याचा लाल रंग दिसला म्हणजे सोने पे सुहागा. मंडळी, आज रात्री चांदोबाचे अलौकिक सौंदर्य पाहण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. चक्क स्ट्रॉबेरी कलरमधला चंद्र आज दिसणार आहे. 

तर, आज रात्री आणि उद्यासुद्धा तुम्ही कधीच बघितला नसेल असा चांदोबाचा अवतार तुम्हाला बघायला मिळणार आहे.  स्ट्रॉबेरीमून म्हणजे स्ट्रॉबेरी कलरमधला चंद्र रात्रीच्या नीरव सुंदरतेत भर घालणाऱ आहे. नासा स्ट्रॉबेरीमूनला हनीमून म्हणते. पण हा लग्नानंतरचे हनीमून नाही बरं का मंडळी!! तर असा हा स्ट्रॉबेरीमून आज रात्रभर आकाशात चमकणार आहे. 

मंडळी, २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो हे तुम्ही शाळेत शिकलाच असाल. त्याच्या पूर्वसंध्येला दोन दिवस स्ट्रॉबेरीमून आकाशात दिसणार आहे. मंडळी, जेव्हा क्षितिजभर लाल रंगाचा चंद्रप्रकाश पसरलेला दिसेल  आणि आकाशसुद्धा लाल रंगात न्हाऊन निघत असतानाचा नजारा तुम्ही पाहातच राहाल.

तुम्ही म्हणाल लाल किंवा स्ट्रॉबेरी रंगात चंद्र दिसण्याचे कारण काय आहे? तर मंडळी फक्त लाल रंगात नाहीतर गुलाबी रंगातसुद्धा चांदोबा दिसतो. आणि हे कलर बदलणे आकाशातील घडामोडींमुळे होत असते. पृथ्वी आणि चंद्राचे एकमेकांमधील अंतर, तसेच त्यांचे आकाशातील स्थानसुद्धा याला कारणीभूत आहे. मंडळी, चंद्र सहसा पांढरा दिसत असतो, पण उगवण्या किंवा मावळण्याच्या वेळी मात्र तो लाल दिसतो. याचे कारण सतत बदलणारे आकाशातील वातावरण आणि तुम्ही कुठून ते बघत आहात ते आहे. असेही सांगितले जात आहे कि मागच्या वर्षीच्या जुलैमध्ये दिसलेल्या सुपरमून आणि मागच्याच जानेवारी मधील सुपरब्लूमून सारखाच हा पण असेल. पण ते काही खरं नाही.  यावेळचा चंद्र हा पूर्णपणे वेगळा असणार आहे. 

पण मंडळी, इथे प्रॉब्लम असा आहे की भारतात आपण स्ट्रॉबेरीमून पाहू शकतो कि नाही हे हवामानाच्या हातात आहे. कारण भारतात मान्सूनचे आगमन झालेले आहे.  ढगाळ वातावरणात किंवा धुक्यामुळे चंद्र झाकला जाण्याची शक्यता आहे. अश्या परिस्थितित स्ट्रॉबेरीमून दिसेल की नाही याबद्दल काहीच सांगितले जाऊ शकत नाही. पण अमेरिका आणि यूरोपमध्ये 100% स्ट्रॉबेरीमून बघायला मिळणार आहे.

मंडळी, आजचा स्ट्रॉबेरीमून पाहा, त्याचे फोटो काढा आणि तो तुमच्या मित्रांना पण बघायला मिळावा म्हणून हा लेख जास्तीत जास्त शेयर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required