computer

बैरुत स्फोट: केव्हा आणि कशाने झाला? त्याचा आणि अमोनियम नायट्रेटचा काय संबंध आहे ?

लेबाननची राजधानी बेरुतमध्ये मंगळवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात खूप मोठे नुकसान झाल्याची बातमी आहे. स्फोट एवढा मोठा होता की सुरुवातीला अनेकांना भूकंप झाला की काय असे वाटले. जवळपास २०० किलोमीटरपर्यंत त्याचे पडसाद उमटले. न भूतो न भविष्यती असा हा स्फोट असल्याचे स्थानिक म्हणत आहेत.

मंगळवारच्या संध्याकाळी एका गोदामातल्या फटाक्यांना आग लागली. फटाक्यांचा दणादण आवाज व्हायला लागला आणि धुराच्या ज्वाळा शहरभर दिसायला लागल्या. हे बघण्यासाठी लोक बाहेर पडले तोच अजून एक जोराचा धमाका झाला. हा मात्र अतिप्रचंड होता. ज्वालामुखीसारख्या गोल आगीच्या ज्वाळा दिसत होत्या.

या स्फोटाची तीव्रता इतकी होती की जिथे स्फोट झाला ती जागा चक्क सपाट झाली. मोठमोठ्या इमारती पडल्या. बैरूत नावाचे हे सजलेले शहर आता पडलेल्या इमारतींचे म्युझियम आहे की काय असे त्याचे चित्र झाले. घटनास्थळी पोचलेले गव्हर्नर मरवान यांचा रडतानाचा व्हिडीओ सगळीकडे फिरत आहे. अणुस्फोटाने होते तेवढेच नुकसान यामुळे झाल्याचे ते म्हणत आहेत.

लेबानन देशासाठी बॉम्बस्फोट काय नवीनवलाईची गोष्ट नाही. गेली कित्येक वर्षे तिथे अस्थिरता आहे. पण तरी आता जे झाले त्याने त्या देशाला हादरवून सोडले आहे. स्फोटानंतर खूपच केविलवाणी परिस्थिती निर्माण झाली होती. जखमींना घेऊन जायला दवाखानेच शिल्लक राहिले नव्हते. बचावकार्य सुरु आहे पण मृतांची संख्या मात्र सातत्याने वाढतच आहे.

यादरम्यानच एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. एका हॉलमध्ये लग्न समारंभ सुरू आहे. तेव्हाच स्फोट झाला आणि पुढे सगळीच घडी विस्कटली. अजून एक असाच व्हिडीओ वायरल झाला त्यात एक व्यक्ती आपल्या मुलीला स्फोटापासून वाचवण्यासाठी लपवताना दिसत आहे.

ज्या गोदामात स्फोट झाला त्याच्याजवळ एक गोडाऊन होते. त्यात जवळपास २७०० टन अमोनियम नायट्रेट ठेवलेले होते. त्या भीषण स्फोटामागे हेच अमोनियम नायट्रेट असल्याचे बोलले जात आहे.

अमोनियम नायट्रेट म्हणजे काय?

या केमिकलमध्ये मोठ्या प्रमाणावर नायट्रोजन असते. नायट्रोजनचा मोठा उपयोग फर्टिलायझर्स म्हणजेच खते बनविण्यासाठी होतो. बरेचदा हे केमिकल कुकरमध्ये ठेऊन बॉम्बही बनवले जातात. मुंबई लोकलच्या स्फोटावेळी हाच फर्टिलायझर-कुकर बॉम्ब वापरला गेला होता. लंडनला झालेल्या साखळी स्फोटांपासून ही टर्म जन्माला आलेली आहे.

अमोनियम नायट्रेटचा एक खास गुण म्हणजे जेव्हा आग लागते तेव्हा मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन आगीकडे ओढला जातो. अशा परिस्थितीत त्याचा धोका अजूनच जास्त वाढतो. नायट्रेटचा एवढा प्रचंड साठा तिथे पोचला कसा यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. यामागे आंतरराष्ट्रीय राजकारण असण्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे.

लेबनॉनसाठी मात्र हा स्फोट हे महाकाय संकट ठरले आहे. भीषण मंदी, त्यात गृहयुद्धसदृश परिस्थिती, त्यातच पुन्हा आता हा स्फोट!! यात लेबाननचे सामान्य नागरिक पिचले जात आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required