फेसबुकवर नवीन अफवा पसरली आहे कि तुमचे सगळे अपडेट्स पब्लिक होणार

फेसबुकवरचे नवे खूळ पाहिलेत का? तुमच्या मित्रयादीतले लोक लांबलचक अपडेट टाकत आहेत. ते म्हणत आहेत कि तुमचे आजवरचे सगळे अपडेटस आणि फोटोज फेसबुक पब्लिक करून टाकणार. एवढेच नाही, तर डिलिट केलेले फोटोज पण पब्लिक होणार. या नंतर एक मोठा मेसेज असतो. कुठल्याश्या कायद्याचा हवाला देऊन असे लिहिले जाते कि आम्ही फेसबुकला आमच्या पोस्टस पब्लिक करण्यापासून मनाई केली आहे. तुम्ही सगळे पण हे स्टेटस कॉपी पेस्ट करा.

All your posts can become public tomorrow . Even the messages that have been deleted or the photos not allowed. Better safe than sorry! After all, it does not cost anything. this is change in Facebook’s privacy policy. I do not give Facebook or any entities associated with Facebook permission to use my pictures, information, messages or posts, both past and future. By this statement, I give notice to Facebook it is strictly forbidden to disclose, copy, distribute, or take any other action against me based on this profile and/or its contents. The content of this profile is private and confidential information. The violation of privacy can be punished by law (UCC 1-308- 1 1 308-103 and the Rome Statute).

NOTE: Facebook is now a public entity. All members must post a note like this. If you prefer, you can copy and paste this version. If you do not publish a statement at least once it will be tactically allowing the use of your photos, as well as the information contained in the profile status updates. DO NOT SHARE. You MUST copy and paste.

एक गंमत सांगतो, UCC 1-308- 1 1 308 103 हे सर्च करा. तुम्हाला कळेल हे नवे खूळ नाही. आजपासून 4 वर्षांपूर्वी हे सुरु झाले, 2 वर्षांपूर्वी परत आले आणि आता परत एकदा सेम प्रकार घडतोय. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही इथं स्टेट्स टाकले तर फेसबुक त्यानुसार आपलं धोरण बदलेल? तिकडे झुक्या (मार्क झुकरबर्ग) तुमचे स्टेट्स वाचायला बसला आहे. फेसबुकमधे काही बदल घडत नाहीए. तुम्हाला एवढीच जर प्रायव्हसीची काळजी आहे तर सेटींग्समध्ये जाऊन सगळ्या पोस्टस 'ओन्ली मी' करून टाका म्हणजे कुणालाच दिसणार नाही. पण मग तुम्हाला चमकोगिरी पण करता येणार नाही.

 

सबस्क्राईब करा

* indicates required