जवानांसाठी पैसे पाठवायचे आहेत? जाणून घ्या खऱ्या लिंक्स कोणत्या आणि कोणत्या आहेत खोट्या!!

पुलवामा येथील १४ फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतर भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटली. लोकांचा राग तर दिसलाच शिवाय हजारो हात जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीला पुढे सरसावले. लोकांनी जमेल तेवढी मदत देऊ केली. पण जिथे पैशांची गोष्ट येते तिथे फसवेगिरी कमी प्रमाणात का असेना पण दिसून येतेच.
दुर्दैवाने जवानांच्या मदतीसाठी गोळा केल्या जाणाऱ्या निधीतही काही लोकांनी फसवेगिरी सुरु केली आहे. खोटे फोटोज, व्हिडीओ आणि आता तर लिंक शेअरकरून लोकांना फसवलं जात आहे. उदाहरणा दाखल खालील मेसेज पाहा.
Dear @PMOIndia , such messages with account number for donation are viral on #WhatsApp. I don't know whether these are real accounts or Fake Loot Accounts. Please check it's credibility, & if It is false account please take necessary action.#StandWithForces#IndiaWantsRevenge pic.twitter.com/gRVEYqf2O4
— $H@!L€$H K@$@T (@shaileshkasat) February 16, 2019
एका ट्विटर युझरने हा मेसेज शेअर करून या फसवेगिरीची माहिती दिली आहे. या मेसेजेस मध्ये अक्षय कुमारच्या नावाने लोकांकडून पैसे गोळा केले जात आहेत. एका मेसेज मध्ये तर पंतप्रधानांच्या नावे पैसे उगाळले जात आहेत. तुम्हालाही जर असे मेसेज येत असतील तर त्याची शहनिशा नक्की करा.
मंडळी, मग जर जवानांसाठी पैसे पाठवायचे झाले तर काय करायचं ? तर त्यासाठी आम्ही भारतीय सरकारची अधिकृत लिंक देत आहोत. या लिंकवर जाऊन तुम्ही पैसे पाठवू शकता.
तर मंडळी, जवानांना आर्थिक मदत नक्कीच केली पाहिजे, पण चुकीच्या हातात पैसे जाऊ देऊ नका !!
आणखी वाचा :
भारताच्या सायबर आर्मीने दिले पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर....कोण आहे ही सायबर आर्मी ??
गेल्या ५ वर्षात भारतीय सुरक्षा दलावर झालेले ६ मोठे दहशतवादी हल्ले !!