इंग्लंडच्या नोटेवर असणार चक्क एका भारतीयाचा चेहरा...जाणून घ्या जगदीशचंद्र बोसांना हा मान का दिला जात आहे?

मंडळी, बँक ऑफ इंग्लंड ५० पाऊंडची नवीन नोट छापणार आहे. नवीन नोटेसोबत त्यांना एक नवीन चेहरा छापायचा आहे. यासाठी त्यांनी लोकांनाच पर्याय सुचवायला सांगितलं होतं. यावर लोकांनी तब्बल १ लाख ७५ हजार नावे सुचवली. शेवटी यातली काही नावे वगळून आता १ लाख १४ हजार नावे उरली आहेत.

प्रत्येक भारतीयाला अभिमानस्पद वाटेल अशी गोष्ट म्हणजे या १,१४,००० लोकांमध्ये मध्ये एक भारतीय माणूस सुद्धा आहे. त्यांचं नाव सर जगदीशचंद्र बोस. कदाचित इंग्लंडच्या आगामी नव्या नोटेवर एका भारतीयाचा चेहरा चेहरा असू शकतो.

स्रोत

मंडळी, योगायोग म्हणजे २०१८ हे वर्ष जगदीशचंद्र बोस यांच्या १६० व्या जयंतीचं वर्ष आहे. चला तर जाणून घेऊया तो कोणता शोध आहे ज्यामुळे जगदीशचंद्र बोस याचं विज्ञानातलं महत्व अनन्यसाधारण आहे.

सर जगदीशचंद्र बोस यांचा सर्वात महत्वाचा शोध म्हणजे ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केलं. वनस्पतींमध्ये श्वसन व रक्ताभिसरण प्रक्रिया असते हा शोध त्यांचाच. याशिवाय त्यांचा आणखी एक शोध आहे ज्याबद्दल फारच क्वचित बोललं जातं. हा शोध म्हणजे “वायफाय’ (Wi-Fi).

स्रोत

वायरलेस तंत्रज्ञानात जगदीशचंद्रांचं योगदान फार मोठं आहे. त्यांच्या संशोधनामुळेच आधुनिक रेडिओ विकसित होऊ शकला. टेसला, मार्कोनी या नामवंत शास्त्रज्ञांबरोबर त्यांची गणना रेडिओचा जनक म्हणून केली जाते. वायरलेस सिस्टीम आणि रेडिओ तंत्रज्ञान विकसत झालं नसतं तर आजच्या काळातील अत्यंत महत्वाच्या अशा ‘वायफाय’चा शोध लागलाच नसता. अशा प्रकारे जगदीशचंद्र बोस हे वायफायचा जनक ठरतात.

स्रोत

रेडिओला विकसित करण्याचं श्रेय ‘गुलियेल्मो मार्कोनी’ या शास्त्रज्ञाला जातं. मार्कोनी जेव्हा रेडिओ विकसित करण्याचं काम करत होते तेव्हा त्यांच्याही आधी जगदीशचंद्रांनी रेडिओ बनवण्याच्या दिशेने पाऊल उचललं होतं. दोघांची प्रत्यक्षात भेटही झाली होती. जगदीशचंद्र बोस यांचं महत्व मार्कोनी यांनी सुद्धा मान्य केलं आहे.

मंडळी, अशा या प्रतिभावंत शास्त्रज्ञाचा आज जन्मदिन. त्यांच्या कामाची दखल जगभरात घेण्यात आली, पण त्यांच्याच देशात मात्र ते फारसे कोणाला ज्ञात नाहीत हे खेदाने म्हणावं लागतं. जर इंग्लंडच्या नोटेवर त्यांचा चेहरा छापण्यात आला तर प्रत्येक भारतीयासाठी तो अभिमानाचाच क्षण असेल.

बोभाटा तर्फे सर जगदीशचंद्र बोस यांना आदरांजली !!

सबस्क्राईब करा

* indicates required