नाक आणि ओठांच्या मध्ये हा खड्डा कसला असतो भाऊ? जाणून घ्या...
तर मंडळी, पृथ्वीच्या पाठीवर अब्जावधी लोकं आहेत. प्रत्येकाचा चेहरा भिन्न, शरिराची ठेवण भिन्न. पण सगळ्यांच्यात आढळणारं एक अगदी छोटं साम्य म्हणजे नाक आणि ओठांच्या मधला हा खड्डा.
का बरं असतो हा खड्डा? कशासाठी? आरशात आपला चेहरा न्याहाळताना कधीतरी प्रत्येकाच्या मनात चमकून गेलेला हा प्रश्न. पण उत्तर किती लोकांना मिळालं? डोन्ट वरी, आता ते आम्हीच सांगतोय...
नाकाखाली आणि ओठांच्या वर असणार्या या खड्डा सदृश्य व्रणाला शास्त्रीय भाषेत 'फिल्ट्रम' (Philtrum) असं नाव आहे. याचा आपल्याला तसा काहीही उपयोग नसतो. खरंतर या रेषा आपण गर्भावस्थेत असल्यापासूनच आपल्याला मिळाल्या आहेत. गर्भावस्थेच्या सुरूवातीच्या काळात भृणाला चेहरा नसतो. दोन ते तीन महिन्यानंतर भृणाचा चेहरा बनण्याची प्रक्रिया सुरू होते. यावेळी आधी नाकपुड्या, ओठ हे भाग वेगवेगळ्या ठिकाणी तयार होऊन नंतर ते आपापल्या जागी पोहचतात. यावेळी या रेखा दिसायला लागतात.
कधीकधी ओठ आणि नाकपुड्या योग्य ठिकाणी बसले नसल्या की मग ओठ तुटलेल्या बाळाचा जन्म होतो. आपल्याप्रमाणे इतर प्राण्यांमध्येही अशा निरूपयोगी रेषा आढळतात, मात्र कुत्रा आणि मांजरांमध्ये गंध घेण्यासाठी या फिल्ट्रमची मदत होते.
एकंदरीत आपला चेहरा बनण्याच्या आधीपासून हा खड्डा आपल्याला साथ देतोय. आहे ना गमतीदार? करा मग शेअर...




