computer

३४ इंचाचा पिझ्झा एका तासात संपवा आणि ३४ हजार रुपये बक्षीस घ्या !!

भारतात तुम्हांला सगळ्या प्रकारचे लोक सापडतील. खवय्ये तर खूपच सापडतील. काहीजण  सगळीकडे फिरून विषय शेवटी खाण्यावरच आणताना दिसतात. काही तर बसल्या बैठकीत खूप खाण्याची ताकद आणि वेगासाठी ओळखले जातात. अशा सगळ्या खवय्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. 

 'आज कुछ तुफानी' करण्याची आवड असणाऱ्या आणि तीही  खाण्याच्या शौकीन लोकांसाठी दिल्लीला एक  स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  हे कॉम्पिटिशन जिंकल्यावर तुम्हाला तब्बल ३४ हजार रुपये बक्षीस मिळणार आहे राव!! काय आहे ही  स्पर्धा? तर मंडळी, एका तासात ३४ इंचाचा पिझ्झा संपवायचा आहे. घरी आणलेला पिझ्झा काही सेकंदामध्ये खाऊन टाकणाऱ्या लोकांनी तर या कॉम्पिटिशनमध्ये सामील होण्याविषयी जरूर विचार करावा.

दिल्लीतील हा सर्वात मोठा पिझ्झा असल्याचे सांगण्यात येत आहे.  हा पिझ्झा वेगवेगळ्या ऑप्शन्समध्ये तुम्ही खाऊ शकता. फोर चीज, सुप्रीम व्हेज, चीज अल्फ्रेडो, आणि स्पेशल अमेरिकन कनेक्शन असलेले बेकन, सॉसेजेस, पेप्परोनी हे सगळेही ऑप्शन आहेत राव!!  यासोबतच तुम्हांला हवा तो, हवा तसा कस्टमाईझ्ड् पिझ्झाही तयार करून द्यायला ते तयार आहेत, फक्त एका तासात तुम्ही तो संपवायला पाहिजे ही अट मात्र आहे. 

काहीजणांना वाटेल, त्यात काय एवढं? हे तर कुणीही करुन दाखवेल. आम्हीही एकदा पिझ्झा खायला बसलो म्हणजे  सहज आणि पटापट सगळे पीसेस गट्टम करतो.  पण मंडळी, ३४  इंचाच्या पिझ्झामध्ये किती लोकांचे पोट भरु शकते माहित आहे का? तब्बल १५ लोकांचे!! तेव्हा आता १५ लोकांचे जेवण तुम्हाला जेवायचे आहे या मानसिक तयारीनेच या स्पर्धेत सहभागी व्हा, नाहीतर तिथे जाऊन फजिती व्हायची. 

दुसऱ्या दिवशी भंडारा असेल तर एक दिवस आधी काहीही न खाणारे खवय्ये तुम्हाला माहित असतीलच. हीच आयडिया इथे वापरली तर तुमचा फायदा आहे राव!! रिकाम्या पोटी तिथे जायचे आणि दाबून पिझ्झा खायचा.

हे कॉम्पिटिशन इथे आहे बरं..  

The American connection, f-1, 2nd floor, kalkaji main market, kalkaji, New Delhi

मंडळी, तुम्ही ही स्पर्धा जिंकलात तर माहितीसाठी आम्हाला एक पिझ्झा खाऊ घातला तरी चालेल..

 

लेखक : वैभव पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required