आजपासून मुंबईत 'एसी लोकल', जाणून घ्या वेळापत्रक आणि तिकीटदराबद्दल...
रेल्वे विभागाने प्रवाशांना ख्रिसमस भेट द्यायचं ठरवलं आहे. हे गिफ्ट असणार आहे मुंबईतली पहिली ‘एसी लोकल ट्रेन’ भाऊ. बऱ्याच दिवसांपासून एसी ट्रेनच्या चर्चा होत्या, पण आज त्याला मुहूर्त मिळाला आहे. कालच चर्चगेट ते अंधेरीपर्यंत एसी लोकलची चाचणी झाली आणि आता ती प्रवाशांच्या सेवेत हजर झाली आहे. मुंबईकरांनो, एसीच्या मस्त वातावरणात प्रवास करण्याआधी खालील माहिती वाचून घ्या !!

चला जाणून घेऊ या एसी ट्रेनबद्दल काही महत्वाचे मुद्दे :
१. ही ट्रेन आज १० वाजून ३० मिनिटांनी चर्चगेट ते बोरीवली दरम्यान धावली.
२. २५ ते २९ डिसेंबरपर्यंत प्रायोगिक तत्वावर एसी लोकल सुरु करण्यात आली आहे.
३. या ५ दिवसात चर्चगेट ते बोरीवली असा प्रवास एसी लोकलने करता येईल.
४. १ जानेवारीपासून चर्चगेट ते विरारपर्यंत एसी लोकल वाढवण्यात येणार आहे.
५. १ जानेवारीपासून १२ फेऱ्या असणार आहेत.
६. यातील ८ फेऱ्या फास्ट, ३ सेमी फास्ट तर १ फेरी स्लो असणार आहे.
७. एसी लोकलचं किमान तिकीट ६५ रुपये आणि कमाल तिकीट २०५ असणार आहे.
८. पहिला आणि शेवटचा डबा स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
९. एसी लोकलचं वेळापत्रक पुढील प्रमाणे असेल :
डाऊन :
कुठून | कुठपर्यंत | वेळ | प्रकार |
चर्चगेट | बोरीवली | ९.३० | जलद |
चर्चगेट | बोरीवली | ११.१५ | जलद |
चर्चगेट | बोरीवली | १३.१६ | जलद |
अप :
कुठून | कुठपर्यंत | वेळ | प्रकार |
चर्चगेट | बोरीवली | १०.२० | जलद |
चर्चगेट | बोरीवली | १२.२४ | जलद |
चर्चगेट | बोरीवली | १४.११ | जलद |
१०. १ जानेवारीपासून वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल :
डाऊन :
कुठून | कुठपर्यंत | वेळ | प्रकार |
महालक्ष्मी | बोरीवली | ०६.५८ | धीमी |
चर्चगेट | विरार | ०८.५४ | जलद |
चर्चगेट | विरार | ११.५० | जलद |
चर्चगेट | विरार | १४.५५ | जलद |
चर्चगेट | बोरीवली | १७.४९ | जलद |
चर्चगेट | विरार | १९.४९ | जलद |
अप :
कुठून | कुठपर्यंत | वेळ | प्रकार |
बोरीवली | चर्चगेट | ०७.५४ | धीमी |
विरार | चर्चगेट | १०.२२ | जलद |
विरार | चर्चगेट | १३.१८ | जलद |
विरार | चर्चगेट | १६.२२ | जलद |
बोरीवली | चर्चगेट | १८.५५ | जलद |
विरार | चर्चगेट | २१.२४ | जलद |




