गीर वनाधिकाऱ्यांची कौतुकास्पद कामगिरी....त्यांनी या दोन सिंहांसाठी चक्क 'हे' केलं !!

मंडळी, आपण जोडप्यांना त्यांची त्यांची प्रायव्हसी देतो, मग त्यांच्या मध्ये कोणीही आलेलं चालत नाही. माणसांचं हे असं तर प्राण्यांचं काय ? प्राण्यांची एक ठराविक समागमाची वेळ असते. आपल्याकडे ही वेळ म्हणजे लोकांसाठी आकर्षणाची गोष्ट आहे राव. प्रत्येकालाच हा क्षण कॅमेऱ्यात टिपायचा असतो. (याबाबतीत डिस्कव्हरीवाले पटाईत आहेत.) गेल्या वर्षीच पुण्यात सापांच्या मिलनाच्या वेळी बघ्यांची एवढी गर्दी जमली की पोलिसांना यावं लागलं.

गीर राष्ट्रीय उद्यानातील वनाधिकाऱ्यांनी सिंहांच्या मिलनाच्या दृष्टीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे ज्याचं अनेकजण कौतुकच करतायत. त्यांनी शुक्रवारी संध्याकाळपासून ते शनिवारी सकाळ पर्यंत जंगलाचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद ठेवले होते. सिंहांचे जोडपे समागमासाठी जंगलाच्या अगदी आत गेले असल्याने  त्यांना ‘प्रायव्हसी’ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

स्रोत

मंडळी, ही बाब फक्त समागमाच्या बाबतीत महत्वाची नाही तर पर्यटकांच्या सुरेक्षेच्या दृष्टीनेही गरजेची आहे. अशावेळी सिंहासारखा प्राणी हल्ला करण्याची शक्यता असते. अगदी हेच शुक्रवारच्या संध्याकाळी घडलं. वनाधिकाऱ्यांना खबर मिळाली होती की सिंहाने पर्यटकांच्या गाडीवर हल्ला केला शिवाय एका बाइकस्वराचा पाठलागही केला आहे. यानंतर सिंहांना कसलाही व्यत्यय येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली गेली.

मंडळी, प्राणी आणि माणसामध्ये योग्यवेळी योग्य ते अंतर असेल तर नक्कीच दोघांच्याही जीवाला धोका पोहोचणार नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required