बॅ. नाथ पै : कोकण रेल्वे आली पण आपण यांना विसरून गेलो.

कोकण रेल्वे म्हटलं की मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडीस - इ.श्रीधरन या सगळ्यांची आठवण सहज मनात येते.अर्थात या सगळ्यांना कोकण रेल्वेच्या निर्मितेचे  श्रेय मिळायलाच हवे पण त्याच क्षणी एका माणसाची कोणीही आठवण काढत नाही तो माणूस म्हणजे बॅरीस्टर नाथ पै ! 
कोकण रेल्वेची मूळ संकल्पना याच नेत्याची - लोकसभेत १९६० पासून सतत कोकण रेल्वे या संकल्पनेचा पाठपुरावा करणारा हा एकमेव नेता होता.कोकणी माणसांच्या विशेषतः कोकणी चाकरमान्यांच्या हाल अपेष्टा कमी व्हाव्या म्हणून आणि पर्यायाने किनारपट्टी आर्थिकदृष्ट्या समृध्द व्हावी या एकमेव हेतूसाठी हा माणूस कायम झिजला.अल्पायुषी असल्याने त्यांचे स्वप्न साकार झालेले ते बघू शकले नाहीत. 
आज पनवेल ते मंगळूर या ७४० किलोमीटर लांबीच्या कोकण रेल्वे मार्गाने त्यांचे स्वप्न साकारले आहे.
कोकण रेल्वेच्या ६९ स्टेशनपै़की एकाही स्थानकाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव नाही. आता ही चूक रेल्वेच्या माथ्यावर मारून मोकळे होऊ नका , जबाबदारी आपली पण आहे ना ? सोय झाली आणि आपण त्यांना सोयीस्करपणे विसरलो ! 
आता कोकणातल्या चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे असे ऐकतोय खरं पण बूंद से गयी वो हौद से कैसे आयेगी ?
बॅ. नाथ पै यांचा आज स्मृतीदिन आहे त्या निमित्ताने  हे लिहावेसे वाटले.
 

सबस्क्राईब करा

* indicates required