computer

नातीचं घरी हेलिकॉप्टरमधून स्वागत करणारे पुण्याचे आजोबा!! वाचा तर खरे किस्सा काय आहे!!

कधीकाळी मुलगी जर घरात जन्मली तर लोकांचे चेहरे उतरत असत. हे सर्वांना लागू नसले तरी मुलगा म्हणजे वंशाचा दिवा अशाप्रकारे मुलगा होण्याचे कौतुक साजरे केले जात असे. आता हळूहळू का होईना वातावरण बदलत आहे. मुलगी जन्माला आली की आनंद साजरा करणारे लोक दिसायला लागले आहेत. कुणी साखर वाटते तर कुणी गावजेवण देतात.

पुण्यातील बालेवाडी येथे मात्र घरात मुलगी झाली म्हणून आनंद झालेल्या आजोबांनी थेट हेलिकॉप्टर मागवून नातीला या हेलिकॉप्टरमधून घरी आणले आहे. बालेवाडी येथील अजित पांडुरंग बालवाडकर यांनी तब्बल लाखभर रुपये खर्च करून नातीला घरी आणले.

.

एवढेच नव्हे, तर गावभर त्यांनी मिठाई वाटली आहे. गेले तीन दिवस त्यांचा मुलगी झाल्याचा आनंद साजरा केला जात आहे. अजित बालवाडकर शेतकरी आहेत आणि त्यांनी आपल्या नातीचे नाव कृषीका असे ठेवले आहे. अजित सांगतात की, आपल्याला जेव्हा नात झाली तेव्हा किती आणि कसा आनंद साजरा करावा असे मला झाले. यासाठी परिसरात ढोल वाजविण्यात आले

नात घरी येत असताना संपूर्ण अंगण फुलांनी सजविण्यात आले होते. संपूर्ण परिवार यावेळी एकत्र आले आणि त्यांनी एखाद्या सणाप्रमाणे मुलीचे आगमन साजरा केले आहे. वास्तविक जुन्या पिढीतील एक गृहस्थ आपल्या घरी जन्माला आलेल्या मुलीचे असे स्वागत करतात ही गोष्ट कौतुकास्पद आहे.

कृषिका जेव्हा मोठी होईल तेव्हा आपल्या आजोबांनी केलेला हा जंगी सोहळा तिला माहीत होईल तेव्हा तिला आपण खास व्यक्ती असल्याचे तर जाणवेलच, पण आपल्या आजोबांच्या मनाच्या मोठेपणाचा अभिमान तिला वाटल्याशिवाय राहणार नाही.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required