याने चक्क 46 तास आपला वाढदिवस साजरा करून केलं वर्ल्ड रेकॉर्ड..

वाढदिवस स्पेशल असतो, प्रत्येकाला त्या दिवशी स्वतः बद्दल लै भारी  वाटत असतं आणि आपला हा दिवस कधीच संपू नये असे पण वाटत असतं. स्वेन हेजमियर या जर्मन माणसानं आपला वाढदिवस चक्क 46 तास साजरा केला. कसा? त्यानं वेगवेगळ्या टाइम झोन्स मधून प्रवास करत हा प्रताप केलाय.

न्यूझिलँडमधल्या ऑकलंड मधून प्रवास चालू करून ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेनमार्गे त्यानं हवाई बेटात या प्रवासाची सांगता करत 46 तास वाढदिवस साजरा करण्याचा रेकॉर्ड बनवलाय.  हे असले उद्योग करणारा हा एकटाच नाही हं. यापूर्वी पाकिस्तानच्या नर्गिस भीमजी या महिलेनं 35 तास वाढदिवस साजरा केला होता. तिनं १९९८ साली कराची ते सॅन फ्रान्सिस्को व्हाया सिंगापूर असा प्रवास करून वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं. 

 

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required