आणि त्यांनी मुलीचं नांव चक्क‌ GST ठेव‌लं!!

३० जून च्या मध्यरात्री GSTचं लोकार्पण करण्यात आलं आणि १ जुलै पासून जुनी करप्रणाली रद्द झाली. हा निर्णय चांगला की वाईट, हा नंतरचा मुद्दा. पण राजस्थान मध्ये GST ने एक आगळी वेगळी गोष्ट घडली.

१२ वाजता GST लागू झाल्यानंतर १२ वाजून २ मिनिटांनी एका मुलीचा जन्म झाला आणि जन्म देणाऱ्या आईने मुलीचं नाव चक्क GST ठेवलंय. राव, GST चा असा इफेक्ट होईल हे मोदींना पण वाटलं नसणार... नाही का?

ही घटना आहे राजस्थान मधील ‘ब्यावर’ शहरातली. करप्रणालीत बदल केल्याच्या ऐतिहासिक निर्णयाची आठवण म्हणून हे नाव ठेवलं असल्याचं दिसतंय. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी नवजात मुलीचं स्वागतात ‘Live long & healthy Baby GST !’ असं ट्विट केलं. असं नांव ठेव‌णारं हे प‌हिलंच उदाह‌र‌ण नाही ब‌रं.. लालूंनी त्यांच्या मिसा भार‌ती या मुलीचं नांव मिसा काय‌द्याव‌रून ठेव‌ल‌ं होतं असं म्ह‌ण‌तात. 

पण मी काय म्हणतो, बरं झालं मुलीचा जन्म GST च्या मुहूर्तावर झाला. नाही तर नोट बंदीच्या दिवशी झाला असता तर मुलीचं नाव आईने नोट बंदी ठेवलं असतं. नाय का?

आपली एक गम्मत ओ....बाकी काय नाय !!!

सबस्क्राईब करा

* indicates required