मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

मुलाला गुटखा खाताना बघून मुलीने भर मंडपात मोडलं लग्न...वाचा पुढे काय झालं!!!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
मुलाला गुटखा खाताना बघून मुलीने भर मंडपात मोडलं लग्न...वाचा पुढे काय झालं!!!

२०१६ मध्ये एका मुलीने घरात बाथरूमची व्यवस्था नसल्यानं लग्न करायला नकार दिला होता. यावर्षी मार्चमध्ये एका मुलीने जोपर्यंत बाथरूम बांधणार नाही तोवर मी लग्न करणार नाही असं ठणकावलं होतं. या बदलाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक घटना घडली आहे मंडळी...

Image result for tambakuस्रोत

उत्तर प्रदेशच्या मुरारपट्टी इथं राहणाऱ्या एका मुलीनं होणारा नवरा गुटखा, तंबाखू खातो म्हणून लग्नाला साफ नकार दिलाय. झालं असं की लग्नासाठी जेव्हा मुलगी मंडपात आली, तेव्हा तिनं मुलाला तंबाखू खाताना बघितलं आणि तिथेच या व्यसनी माणसाशी लग्न करणार नाही असा निर्णय घेतला.

अर्थात तिच्या निर्णयाने सगळ्यांना धक्का बसला. सर्वांनी तिला समजावलं, पण काही उपयोग झाला नाही राव. शेवटी मुलाच्या घरच्यांनी तिच्या विरुद्ध पोलिसात तक्रार केली. पण तरीही ती मागे हटली नाही. मानलं राव या मुलीला!!

’टॉयलेट : एक प्रेम कथा" अश्याच एका साहसी मुलीच्या निर्णयावर आधारित सिनेमा ११ ऑगस्ट २०१७ ला रिलीज होतोय. सिनेमात लग्नानंतर घरी बाथरूम नसल्याने मुलगी घर सोडून निघून जाते असं त्यात दाखवण्यात आलंय.

बघा, गाय छाप मळणारं कुणी असेल तर आत्ताच निर्णय घ्या.. 

 

 

 

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

कारखाने, जमीन आणि मशिनरीच्या पलीकडे गेलेली अर्थव्यवस्था!
लाइफस्टाइल

कारखाने, जमीन आणि मशिनरीच्या पलीकडे गेलेली अर्थव्यवस्था!

एनव्हिडीया आणि झोमॅटोच्या मूल्यांकनावरून आज कंपन्यांची खरी ताकद जमिनीवर नसून डेटा, नेटवर्क आणि बौद्धिक संपदेत कशी आहे, याचे विश्लेषण.

५ ऑक्टोबर, २०२६

तुमच्या स्वप्नातल्या घराखाली 'विष' तर पेरलेलं नाही? भाग-२
लाइफस्टाइल

तुमच्या स्वप्नातल्या घराखाली 'विष' तर पेरलेलं नाही? भाग-२

ज्या जमिनीवर तुमची टोलेजंग इमारत उभी आहे, तिचा ५० वर्षांचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? जमिनीच्या प्रदूषणाचा वेध घेणारा लेख.

१३ ऑक्टोबर, २०२६

ॲरिस्टॉटल आणि फिलीस: एका मध्ययुगीन झारीमागील रंजक आख्यायिका
लाइफस्टाइल

ॲरिस्टॉटल आणि फिलीस: एका मध्ययुगीन झारीमागील रंजक आख्यायिका

मध्ययुगीन काळात हात धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'अ‍ॅक्वामॅनिल' झारीची आणि त्यावर कोरलेल्या ॲरिस्टॉटल-फिलीसच्या कथेची गोष्ट.

१६ ऑक्टोबर, २०२६