बॉलीवूडचे बेरोजगार : बघा कोण कोण हाय लिस्ट मधी !!!

राजीव गांधी रोजगार योजनेतून आपल्या काही फिल्मी स्टार्सना काम मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पब्लिकनेच त्यांना स्वीकारलं नाही तर देव तरी काय करणार राव? यांचे पिच्चर बॉक्स ऑफिसवर तोंडावर पडलेत, त्यांच्याकडे अनेक दिवस झाले एकही हिट पिच्चर नाही, अभिनयाच्या नावावर तर बऱ्याचजनांची बोंबच आहे म्हणा. बॉस कोण कोण आहेत या लिस्टमध्ये? चला बघूया!!!

 

१. अभिषेक बच्चन !

Image result for abhishek bachchanस्रोत

अमिताभसारखे पिताश्री आणि ऐश्वर्या रायसारखी पत्नी लाभलेले अभिषेक बॉक्स ऑफिसवर चालले नाहीत. जून २०१६ मध्ये आलेला हाऊसफुल हा त्यांचा शेवटचा चित्रपट. गुरु, युवा, त्यातल्या त्यात लोकांना आवडलेला बोलबच्चन असे मोजके सिनेमे सोडले तर अभिषेक बच्चन कुठेच नीट दिसला नाही. धूम सिरीज मध्ये त्याला अस्सल रोजगार मिळतो ती वेगळी गोष्ट.

 

२. सिद्धार्थ मल्होत्रा!

Image result for sidharth malhotraस्रोत

सप्टेंबर २०१६ मध्ये आलेला ‘बार बार देखो’ नंतर तो कुठे दिसलाच नाही. त्याचे आत्ता पर्यंत ७ सिनेमे रिलीज झालेत. पण म्हणावं तसं त्याच्या अभिनयाची तारीफ होताना दिसत नाही. कदाचित यामुळेच लोकांच्या पसंतीस तो अजून उतरला नाहीये.

 

३. सैफ अली खान!

Image result for saif ali khanस्रोत

२०१५ मध्ये आलेल्या ‘फँटम’ नंतर यावर्षी फेब्रुवारीत ‘रंगून’ आला, पण केमिस्ट्री काही रंगून नाही आली बॉस. २०१५ ते १०१७ या २ वर्षात नवाब सैफ अली खान बेरोजगार होते. सैफच्या 'ओमकारा' आणि 'कल हो ना हो'ची आजही तारीफ केली जाते. पण काही दिवसांपासून दुकान काही चालत नाहीये राव!

 

४. इम्रान हाश्मी!

Image result for emraan hashmiस्रोत

एकेकाळी तरुणांचा आवडता असलेला इम्रान हल्ली फारश्या चित्रपटात दिसत नाही. सप्टेंबरमध्ये आलेल्या ‘राज: रीबूट’ सिनेमा नंतर तो दिसलाच नाही आणि हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पडला. रटाळ कथा आणि सुमार अभिनय कोण बघणार राव!!!

 

५. आदित्य रॉय कपूर!

Image result for aditya roy kapoorस्रोत

‘आशिकी २’ सारखा हिट सिनेमा दिल्यानंतर आदित्यच्या पदरी निराशाच आली. जानेवारीमध्ये रिलीज झालेला ‘ok जानू’ सिनेमा ‘हम्मा हम्मा’ गाण्यामुळे चर्चेत राहिला पण लोकांनी थेटरात जाऊन सिनेमा बघण्याचे कष्ट घेतले नाहीत. आदित्य रॉय कपूरच्या अभिनयाबद्दल न बोल्लेलंच बरं!

 

६. अभय देओल

Image result for abhay deolस्रोत

हा तसा गुणी कलाकार आहे. अभय देओल काही महिन्यांपूर्वी फेअरनेस क्रीमबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला होता. त्यानंतर काही काळ तो ट्रेंडींग होता. अभयचा 'हॅप्पी भाग जायेगी ' सिनेमा २०१६ साली आला व त्या आधी २०१४ साली एक सिनेमा येऊन गेला. त्याच्या 'देव डी' बद्दल मात्र आजही बोल्ल जातं हे मात्र खरं !

‘अखिल भारतीय काळा ढूस’ संघटने तर्फे अभय भाऊ देओलचे आभार !!!

 

७. इम्रान खान!

Image result for imran khan actorस्रोत

अमीर खानचं नाव जोडलं आहे म्हणून फक्त हा बॉलीवूड मध्ये चाल्ला. देली बेली सोडला तर इम्रानच्या करियरला अजून लिफ्ट मिळाली नाहीये. २०१५ ला आलेल्या ‘कट्टी बट्टी’ सिनेमा नंतर तो जणू ‘मिस्टर इंडिया’च झालाय. बेरोजगारीचा फटका बसलाय बिचाऱ्याला.

 

८. विवेक ओबेरॉय!

Image result for vivek oberoiस्रोत

ग्रँड मस्ती, ग्रेट ग्रँड मस्ती असले थोर सिनेमे देणारा विवेक ओबेरॉय सध्या बेरोजगार दिसतोय. जुलै २०१५ मध्ये ग्रेट ग्रँड मस्ती आला होता. आता यावर्षी 'बँकचोर' नावाचा सिनेमा येतोय पण विवेक ओबेरॉयच्या सिनेमांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाल्लीये. काय कारण असावं?

 

९. तुषार कपूर!

Image result for tusshar kapoorस्रोत

अभिषेकप्रमाणे तुषार कपूरसाठी गोलमाल सिरीज ही रोजगार हमी योजने अंतर्गत केली गेलेली व्यवस्था आहे. मस्तीजादे सारखा टुकार सिनेमा जानेवारीत २०१६ ला येऊन गेला. त्यानंतर तुषार कपूर डायरेक्ट चर्चेत आला ते त्याच्या सरोगसीमुळे.

कुंवारा बाप-तुषार कपूरला मुलगा झाला...

 

आता या सगळ्या बेरोजगारांचे आजोबा कोण ? ते आहेत ‘उदय चोप्रा’!!

Image result for uday chopraस्रोत

धूम शिवाय उदय चोप्रा कुठे दिसलेच नाहीत ब्वा. घरी बसून बोर होत नसेल का यांना? फ्री 'वायफाय' असल्यावर कश्याला बोर होतंय मायला !!

 

सिनेमांची चुकीची निवड, अभिनयात आणलेला तोच तोच रटाळपणा किंवा आणखी काही कारणांमुळे हे सगळे हिरो आता झिरो होण्याच्या मार्गावर आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required