मंडळी, पुढच्या ४८ तासांत जगभरातलं इंटरनेट कदाचित बंद पडू शकतं...का ? तेच इथं जाणून घ्या

मंडळी, समजा इंटरनेट बंद पडलं तर ? तेही एका देशापुरतं नव्हे बरं, जगभरातली सगळी इंटरनेट सेवा एकाच बंद पडली तर ? राव ही कविकल्पना कदाचित सत्यात उतरू शकते. कारण पुढील ४८ तासांसाठी म्हणजे २ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. ही अफवा नाही राव.

चला तर इंटरनेट सेवा बंद राहण्यामागचं कारण समजून घेऊया.

स्रोत

मुख्य डोमेन सर्व्हरच्या दुरुस्तीसाठी इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. मुख्य डोमेन व त्याला जोडलेले नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर बंद राहणार असल्याने या दरम्यान इंटरनेट सेवा अगदी कासवाच्या गतीने चालू राहील किंवा अगदीच ठप्प पडेल. हे तुमच्या नेटवर्कआणि सर्व्हिस प्रोव्हायडरवरही अवलंबून आहे.

आता मुख्य डोमेन सर्व्हरची दुरुस्ती म्हणजे काय ते स.मजून घेऊया.

‘इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाइन्ड नेम्स अॅन्ड नंबर्स’ (ICANN) ही संस्था मुख्य डोमेन सर्व्हरच्या दुरुस्तीची आणि एकंदरीत डेटाबेसच्या सुरक्षेची काळजी घेत असते. या संस्थेतर्फे करण्यात येणाऱ्या दुरुस्तीत ‘इंटरनेट अॅड्रेस बुक’ला संरक्षण देणारी ’क्रिप्टोग्राफिक की’ (cryptographic key) बदलण्यात येणार आहे.

स्रोत

‘इंटरनेट अॅड्रेस बुक’ म्हणजे मोठ्या प्रमाणात साठवण्यात आलेला डेटाबेस. एकप्रकारे आपल्या सर्वांची सर्व प्रकारची माहिती या ‘इंटरनेट अॅड्रेस बुक’ मध्ये साठवलेली असते. हल्लीच्या वाढत्या सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी ’क्रिप्टोग्राफिक की’ बदलणं अत्यंत गरजेचं होतं.

‘कम्युनिकेशन्स रेग्युलेटरी अथॉरिटी’ने दिलेल्या माहितीनुसार सुरक्षित, स्थिर, आणि चांगल्या DNS (डोमेन नेम सिस्टम)साठी जगभरातल्या इंटरनेट सेवा बंद राहणे गरजेचे आहे.   

तर मंडळी, आपल्याच माहितीच्या सुरक्षेसाठी इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. पुढील काही तासांमध्ये नेटवर्क फेल्युअर दिसत असेल तर टेन्शन घेऊ नका.

सबस्क्राईब करा

* indicates required