computer

भारतात सापडलीय ३५००टन सोन्याची खाण!!पण तिथून सोनं बाहेर काढणं अवघड का आहे??

भारताच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या जवळजवळ दोन दशकांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर सोन्याची एक प्रचंड मोठी खाण सापडली आहे. या खाणीत तब्बल ३५०० टन सोनं आहे. सध्या भारताच्या तिजोरीत असलेल्या सोन्यापेक्षा हे सोनं ५ पटीने जास्त आहे.

कुठे आहे ही सोन्याची खाण आणि ती कशी शोधण्यात आली? चला जाणून घेऊया.

उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातील सोनपहाडी आणि हर्दी या दोन गावांमध्ये ही सोन्याची खाण सापडली आहे. सोनपहाडी भागात तब्बल २९४३.२५ टन सोनं आहे तर हर्दी गावात ६५० टन सोनं आहे. या भागात सोनं आहे या गोष्टीचा पत्ता ब्रिटीश काळातच लागला होता. म्हणूनच की काय या जिल्ह्याला सोनभद्र आणि गावाला सोनपहाडी नाव मिळालं आहे.

भारताच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने १९९२ पासूनच सोनपहाडी भागात शोध सुरु केला होता. २००५ आणि पुढे २०१२ साली या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं. वर्ल्ड गोल्स काउन्सिलच्या मते भारताच्या तिजोरीत सध्या ६२५ टन सोनं आहे. सोनपहाडी आणि हर्दी येथे सापडलेल्या सोन्यामुळे ही संख्या प्रचंड वाढली आहे. सध्याच्या अंदाजानुसार या सोन्याची किंमत १२ लाख कोटी इतकी प्रचंड असू शकते.

सोनभद्र हा भारतातला एकमेव जिल्हा आहे ज्याच्या सीमा ४ वेगवेगळ्या राज्यांशी जोडलेल्या आहेत. पश्चिमेला मध्यप्रदेश तर दक्षिणेला छत्तीसगड, पूर्वेला बिहार आणि  आग्नेयला  झारखंड आहे. या भागात नक्षलवादी मोठ्याप्रमाणात आहेत. हा भाग तसा आजवर नक्षलग्रस्त म्हणूनच ओळखला जात होता.

तर, यानिमित्ताने आपण ‘वेड्यांचं सोनं’ हेही थोडक्यात जाणून घेऊया. पायराईट या खानिजला ‘वेड्यांचं सोनं’ म्हटलं जातं. पायराईट हे दिसायला सोन्या सारखंच असतं, पण ते लोह आणि सल्फर (गंधक) यांच्या मिश्रणातून तयार झालेलं असतं. दिसायला पितळेसारखं पण त्याला एक चमक असल्याने बघणारा त्याला सोनं समजतो. पायराईटला सोनं समजून फसलेल्या लोकांची अनेक उदाहरणं सापडतात.   

सध्या भारतात कर्नाटक येथील हट्टी येथील सोन्याची खाण ही भारतातली एकमेव सक्रीय स्वरूपातली सोन्याची खाण आहे.या खाणीतून दरवर्षी १४०० ते १६०० किलो सोनं बाहेर काढलं जातं. २०१९ ला बातमी आली होती की हे प्रमाण आता वाढवण्यात येणार आहे. २०२१ पर्यंत या खाणीतून ३५०० टन सोनं मिळवलं जाईल.

तर मंडळी, उत्तर प्रदेशच्या नक्षलग्रस्त भागात एवढी प्रचंड सोन्याची खाण सापडली आहे. आता पुढे काय काय घडतं हे पाहण्यासारखं असेल.

सबस्क्राईब करा

* indicates required