computer

सरकारनं ११ लाख पॅन कार्ड रद्द केलीत, तुमचं कार्ड तर यात नाही ना? वाचा कसे तपासाल.

तसंही आता सध्या टॅक्स रिटर्न भरण्याचे दिवस चालू आहेत. सरकारने ५ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. त्याआधी पॅन आणि आधार जोडण्याचं काम करायचं होतं. तर सध्या वाईट काळ चालू असलेल्या पॅन कार्डबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. सरकारनं म्हणे ११ लाख पॅन कार्ड रद्द केली आहेत. त्यातली बरीचशी कार्डं डुप्लिकेट होती म्हणे. एका माणसाला एकच पॅन कार्ड मिळणार असा नियम आहे. ही सगळी माहिती आज अर्थ राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी राज्यसभेत दिली.

जर तुम्हाला असं वाटतंय की या यादीत तुमचं नाव आहे, तर या सोप्या स्टेप्स करा आणि लगेचच चेक करा की चुकून तुमचंच कार्ड रद्द तर झालं नाही ना?

1. सगळ्यात आधी http://incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर जा

2. या वेबसाईटवर डाव्या बाजूच्या मेन्यूमध्ये तुम्हाला Know Your Pan अशी लिंक सापडेल, त्यावर क्लिक करा.

3. इथे एक नवी विंडो उघडेल आणि तुमच्यासमोर एक फॉर्म उघडला जाईल. या फॉर्ममध्ये आडनाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, जन्मतारीख, फोन नंबर इत्यादी माहिती भरून सबमिटवर क्लिक करा.

4. आता तुमच्या मोबाईलवर एक OTP कोड येईल. तो कोड पुढे दिसणाऱ्या स्क्रीनवर भरून सबमिट करा.

5. आता तुम्हाला तुमच्या पॅनकार्डची माहिती दिसेल, त्यात रिमार्क कॉलममध्ये तुमच्या पॅन कार्डचे स्टेटस ऍक्टिव्ह आहे का चेक करा.

सबस्क्राईब करा

* indicates required