मुंबईच्या रस्त्यावर आता बाईक ऍम्ब्युलन्स.. बघा काय असतील फीचर्स !!

तुम्ही ट्राफिकमध्ये आहात आणि एखादी ऍम्ब्युलन्स सायरन वाजवत रस्ता शोधतेय असा प्रसंग पाहिल्यावर तुमच्या मनात कोणता विचार येतो? पेशंटला वेळेवर उपचार मिळतील का नाही याची काळजीच वाटते. पण आता यावर सरकारने एक उपाय शोधून काढलाय, तो म्हणजे बाईक ऍम्ब्युलन्स. सध्या प्रायोगिक तत्वावर सरकारने १० बाईक्स मुंबईच्या रस्त्यावर उतरवल्या आहेत. तर पाहूयात काय असणार आहेत या बाईक ऍम्ब्युलन्सचे फीचर्स..


1. आपली लाडकी बुलेट ही मॉडिफाय करून या ऍम्ब्युलन्स बनविण्यात आल्या आहेत.

2. प्रत्येक बाईकवर प्रथमोपचाराचं प्रशिक्षण घेतलेली एक   व्यक्ती  ( पॅरामेडिक) 

3. फर्स्ट एड किट आणि  उपचाराची इतर साधनं

4. ऑक्सिजन मास्क असलेलं एअर वे किट 

5. आग विझवण्याचं छोटं उपकरण

6.   ट्रॉमा किट

ही बाईक १०८ नंबर डायल करून बोलावता येणार आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या आणि ट्रॅफिकची समस्या असलेल्या शहराला या बाईक्स म्हणजे एक मोठं वरदान ठरणार आहे..
तर आता  ही बाईक तुम्हाला रस्त्यावर कधी दिसली तर नक्कीच तिला पुढे जाऊ द्या..

सबस्क्राईब करा

* indicates required