computer

या धरणावर गुरुत्वाकर्षणाचा नियम काम करत नाही, नक्की कोणते ठिकाण आहे हे?

जगाचा सगळा समतोल हा गुरुत्वाकर्षणामुळे टिकून राहिला आहे. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसते तर तिथे किती उठाठेव करावी लागते हे आपण पाहतोच. जग हे पूर्णपणे गुरुत्वाकर्षणावर अवलंबून आहे हे कुणीही नाकारणार नाही. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात गुरुत्वाकर्षणाचा नियम काम करतो हे तर सर्वांनाच माहित आहे. पण हे पूर्णपणे खरे आहे का? तर नाही. आज एका अशा ठिकाणाची ओळख तुम्हाला होणार आहे जिथे गुरुत्वाकर्षण कामच करत नाही.

अमेरिकेतील नेवाडा आणि अरिझोना यांच्या सीमेवर हुवर नावाचा डॅम आहे. या ठिकाणी जर एखादी वस्तू फेकली तर ती जमिनीवर न पडता चक्क हवेत तरंगते. आता असे का होत असावे हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर असे आहे, हा डॅम धनुष्याच्या आकाराचा आहे. इथून कुठलीही गोष्ट फेकली तर ती बांधच्या भिंतीला लागून हवेत उडायला लागते.

या हुवर डॅमचे नाव अमेरिकेचे ३१ वे राष्ट्रपती हरबर्ट हुवर यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते. फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांच्या काळात हा डॅम तयार झाला होता. हा डॅम बांधून आता ९० वर्ष होऊन गेले. या डॅमच्या बांधकामात हजारो मजूर लागले होते. त्यातले १०० तर डॅम बांधतानाच मेले होते. या डॅमची उंची ७२६ फूट आहे तर रुंदी ६६० फूट आहे. या डॅमचा आकार दोन फुटबॉलची मैदाने मावतील इतका मोठा आहे. हा डॅम गेली ९० वर्ष हायड्रॉईलेक्ट्रीक इन्स्टॉलेशन्सपैकी एक आहे. जगातील भन्नाट ठिकाणांपैकी हे स्थळ आहे.

पण गुरुत्वाकर्षणाला छेद देणारे हे एकमेव ठिकाण नाही. जगात आणि भारताततही अशी काही विचित्र ठिकाणे आहेत. त्यांच्याबद्दल पुढच्या लेखात नक्की वाचूया..

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required