computer

हस्ताक्षर दिन: महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वांचं असं आहे हस्ताक्षर!!

वाटोळे सरळे मोकळे | वोतले मसीचे काळे | कुळकुळीत वळी चालिल्या ढाले | मुक्तमाळा जैशा || १९-१-२ ||

अक्षरमात्र तितुके नीट | नेमस्त पैस काणे नीट | आडव्या मात्रा त्या हि नीट | आर्कुली वेलांट्या ||१९-१-३ ||

पहिले अक्षर जे काढिले | ग्रंथ संपेतो पाहात गेले | एका टाकेची लिहिले | ऐसे वाटे ||१९-१-४ ||

 

- समर्थ रामदास

 

आज हस्ताक्षर दिन आहे. गांधीजी म्हणाले होते की ‘ज्याचं हस्ताक्षर वाईट असतं, त्याचं शिक्षण अपूर्ण असतं’. अर्थात आता ते चिठ्ठी लिहिण्याचे दिवस संपले. पूर्वी हस्ताक्षर म्हटलं की पंचनामा आणि सात बारा लिहिणाऱ्यांचे अक्षर प्रमाण मानले जायचे. आजचा जमाना कम्प्युटर आणि मोबाईलचा असल्याने आपण दिवसभरात हाताने फार काही लिहित नाही. तुम्हीच आठवून पाहा दिवसभरात तुम्ही किती अक्षरं लिहिता?

असं असलं तरी हस्ताक्षराचं महत्त्व कमी झालेलं नाही. चांगल्या हस्ताक्षराचं आजही आकर्षण आहे. आजच्या हस्ताक्षर दिनाच्यानिमित्ताने आपण महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध व्यक्तींचं हस्ताक्षर पाहणार आहोत. हा लेख वाचून झाला की तुमचं हस्ताक्षरही आम्हाला नक्की दाखवा.

१. पु. ल. देशपांडे

२. जयंत नारळीकर

३. वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)

४. लोकमान्य टिळक

५. लता मंगेशकर

६. बाबासाहेब आंबेडकर

सबस्क्राईब करा

* indicates required