तामिळनाडूमध्ये सापडले हडाप्पासारख्या संस्कृतीचे अवशेष..

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या (ए. एस. आय.)बंगळुरू शाखेने तामिळनाडूच्या किळाडी गावात उत्खनन केलं. आणि त्यांना तिथे सापडलं प्रचंड मोठं शहर.  हडाप्पा आणि मोहिंजोदडो इथे सापडलेल्या मोठाल्या शहरांसारखं प्रचंड.  तिथे सापडलेल्या वस्तूंवरून ते त्या काळातलं अनेक सोयीसुविधांनी सुसज्ज असलेलं नगरकेंद्र असू शकतं , असं संशोधकांचं म्हणणं आहे. हे शहर किमान २५०० वर्षे जुनं असावं असंही एक अनुमान आहे. 

हे संशोधन साधारण २०१३ पासून चालू आहे.  २०१५मध्ये किळाडी इथल्या उत्खननाचा पहिला टप्पा पार पडला. तेव्हा तिथं सुमारे ३००० पुरातन वस्तू सापडल्या. त्यातल्या काही वस्तू परदेशीही आहेत. संशोधकांचं म्हणणं आहे की हे गांव पूर्वी मुख्य रस्त्यावरती असावं आणि त्यामुळे व्यापारी इथं येत असावेत. साहजिकच परदेशातल्या व्यापार्‍यांनी तिकडच्या वस्तू भारतात आणल्या असाव्यात. मोहिंजादडो-हडाप्पासारखी या गावातलीही गटारे अत्याधुनिक आहेत. भाजलेल्या मातीच्या पाईप्समधून हे सांडपाणी वाहून नेलं जात असे असं दिसतं. 

येत्या सप्टेंबरअखेर हे संशोधन चालणार आहे. तोवर आणखीही काही नवीन माहिती मिळते का पाहूयात. 

सबस्क्राईब करा

* indicates required