तुम्ही त्या इसमाला काय शिक्षा द्याल ?

२६ नोव्हेंबर रोजी एअर इंडीयाच्या न्यूयॉर्क ते दिल्ली फ्लाईटमध्ये एका झिंगलेल्या पुरुष प्रवाशाने (त्याला पुरुष तरी का म्हणावे ?) एका महिलेवर लघवी केली.त्याने आणखीही काही केले पण त्याचे वर्णन इथे नको. हा निंदनीय आणि किळसवाणा प्रकार घडल्यानंतर एअर इंडीयाच्या कर्मचार्‍यांनी  त्या प्रवाशावर काहीही कारवाई न करता निव्वळ मख्खपणाची भूमिका घेतली.केवळ त्या महिलेचाच नव्हे तर आपल्या भारतीयत्वाचा अवमान करणारा हा प्रवासी नंतर बिनबोभाट घरी गेला. नंतरच्या आठवड्यात एअर इंडियाच्या मॅनेजमेंटला जाग आली आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली असे कळते आहे.
पोलीसांनी आतापर्यंत कलम 294 (सार्वजनीक ठिकाणी असभ्य वर्तन), 354 (विनयभंग) 509 (महिलेचा अंगविक्षेप करून शाब्दीक रित्या विनयभंग करणे) 510 (दारु पिऊन धिंगाणा घालणे ) आणि हवाई प्रवासाच्या नियमाचा भंग इत्कीच कलमे लावली आहेत. 
 यानंतर पोलीस चौकशी -कोर्ट असा गेम सुरु होईल. त्या महिलेला अर्थातच कोर्टात जावे लागेल. वकीलांच्या आडव्या तिरक्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.त्या महिलेला तो प्रसंग अप्रत्यक्षरित्या भोगावा लागेल. आता आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचार्तो आहे तो असा की या इसमाला तुमच्यासमोर न्याय प्रविष्ट केले तर तुम्ही त्याला काय शिक्षा द्याल ? केवळ महिलेचा विनयभंग करण्याची शिक्षा द्याला ? देशाचा अपमान करण्याची शिक्षा द्याला ?  एकेकाळी प्रवाशांना एखाद्या महाराजासारखी वागवणार्‍या एअर इंडीयाच्या  प्रतिमेला मातीत मिळ्वणार्‍या नव्या मॅनेजमेंटलापण तुम्ही आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणार का ? असे सगळे प्रश्न आमच्या मनात येत आहेत. तुमच्या मनात काय आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि सर्वत्र शेअर करून त्या इसमाला  जनतेच्या न्यायालयात उभे कराल का ? 

सबस्क्राईब करा

* indicates required