गुंतवणूकदारांना लॉटरी लागली होsssss......

गेल्या आठवड्यात ‘एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड’च्या पब्लिक इश्यू बद्दल बोभाटाने दिलेली माहिती तुम्ही वाचलीच असेल. ज्या वाचकांनी या पब्लिक इश्यूसाठी अर्ज केला होता त्यापैकी बहुतेकांना कमीतकमी १३ शेअर्स नक्की मिळाले असतील.
२७ जुलै ही पब्लिक इश्यूची शेवटची तारीख होती. २ ऑगस्ट रोजी या शेअर्सचे वाटप झाले. आज सकाळी राष्ट्रीय शेअर बाजारात आणि मुंबई शेअर बाजारात या शेअर्सची नोंदणी होऊन खरेदी विक्री सुरु झाली. आनंदाची गोष्ट अशी की ११०० रुपयात मिळालेल्या शेअरचा भाव तब्बल १७३९ रुपयात उघडला. म्हणजे १० दिवसात ११०० रुपयावर ६३९ रुपयाचा फायदा झाला. ५८% फायदा १० दिवसात !!
ज्यांना कमीतकमी १३ शेअर्स मिळाले असतील त्यांना घसघशीत ८३०७ रुपयांचा नफा झाला.
आता तुम्ही आम्हाला सांगा, तुम्ही अर्ज केला होता का ? किती शेअर मिळाले ? मिळालेले शेअर विकले का ? आणि शेवटी सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आम्हाला पार्टी कधी देणार ??
ता.क. – हा लेख लिहिता-लिहिताच भाव १८०७ रुपये झाला आहे.