दवडू नका ही सुवर्णसंधी !!

गेल्यावर्षी डी-मार्टचा पब्लिक इश्यू आला होता. तेव्हा आम्ही बोभाटाच्या वाचकांना अॅव्हेन्यू सुपर मार्केट्स (म्हणजेच डी-मार्ट)च्या समभागासाठी अर्ज करावा अशी सूचना केली होती. आज त्या शेअरचा भाव १५६२ रुपये आहे.
अशीच एक सुवर्ण संधी आता एचडीएफसी ‘अॅसेट मॅनेजमेंट कंपनी’ (HDFC AMC) च्या रुपात गुंतवणूकदारांना मिळते आहे. एचडीएफसी या मूळ कंपनीबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर भारतात जेव्हा गृहकर्ज कोणीही देत नव्हते तेव्हा केवळ गृहकर्ज देण्यात पुढाकार घेणारी ही पहिलीच कंपनी होती. इतकेच नव्हे तर ग्रामीण भागाच्या गरजा लक्षात घेऊन त्यासाठी गृह-फायनान्स नावाची दुसरी कंपनी सुद्धा याच समूहाने तयार केली आहे. या दोन्ही कंपन्या आजच्या तारखेस गृहकर्जासाठी अग्रगण्य मानल्या जातात.
नंतरच्या काळात एचडीएफसी बँकेची निर्मिती करून ती सुद्धा आज खाजगी बँकांमधली अग्रेसर बँक मानली जाते. तिसऱ्या टप्प्यात एचडीएफसी स्टँडंर्ड लाईफ (एचडीएफसी इन्शुरन्स)ची स्थापना देखील याच कंपनीने केली. याखेरीज एचडीएफसी म्युचुअल फंडाची स्थापना देखील याच कंपनीने केली. आजच्या तारखेस एचडीएफसी म्युचुअल फंड भारतातला दोन नंबरचा फंड आहे. या म्युचुअल फंडाच्या अॅसेट मॅनेजमेंट कंपनी मधील १००% समभाग आजपासून विक्रीस उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख जुलै २७ आहे.
इश्यू साईज म्हणजे एकूण किती भांडवल ?
२८०० कोटी रुपयांचे भांडवल या पब्लिक इश्यूतून जमा करण्यात येईल.
किती रुपयात एक शेअर मिळेल ?
किरकोळ ग्राहकांसाठी प्राईस बँड रुपये १०९५ – ११०० असा आहे.
कमीतकमी किती शेअरसाठी अर्ज भरता येईल ?
कमीतकमी १३ समभागासाठी अर्ज करायचा आहे.
एकूण कमीतकमी किती गुंतवणूक करावी लागेल. ?
१३ शेअर्ससाठी रुपये १४,३०० गुंतवावे लागतील. ASBA ची सुविधा उपलब्ध आहे.
किती दिवसासाठी ?
जर समभाग दिले गेले नाहीत तर २ ऑगस्ट रोजी गुंतवणूकदाराचे पैसे बँकेत पुन्हा जमा करण्यात येईल.
जर समभाग मिळाले तर ?
६ ऑगस्ट रोजी बीएसई आणि एनएसई वर नोंदणी होईल.
ही गुंतवणूकदारांना उपलब्ध असलेली एक सुवर्णसंधी आहे. लांब पल्ल्याच्या गुंतवणूकदारांना हा समभाग आपल्या पोर्टफ़ोलिओ मध्ये ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.