लोक चक्क एक बुजगावणं बघून का घाबरत आहेत? हा व्हिडीओ पाहिला का?

भारतात जुगाडू लोकांची कमी नाही. जुगाडाचे सर्वात भारी उदाहरण म्हणजे शेतात उभे असणारे बुजगावणे. शेतात पिके फस्त करणाऱ्या प्राणी पक्षांचा बंदोबस्त करण्यासाठी २४ तास शेतात ठाण मांडून बसणे काय शक्य नसते. अशावेळी अगदी माणसारखे दिसणारे बुजगावणे शेतात उभे केले जाऊ लागले.

आता या जुगाडाची आयडिया प्राणी-पक्षांना पण आली आहे. मग काय? ये इंडिया है, त्याही पुढचा जुगाड घेऊन लोक हजर असतात. सध्या ट्विटरवर जुगाडू डोक्यालिटी किती भन्नाट असू शकते याचे उत्तम उदाहरण दाखवणारा व्हिडीओ वायरल होत आहे.

या व्हिडिओत एका स्प्रिंगच्या साहाय्याने बुजगावणे तयार केले आहे. यात इतर बुजगावण्यासारखे एके ठिकाणी न थांबता इकडून तिकडे तिकडून इकडे हे बुजगावणे स्प्रिंगच्या साहाय्याने उड्या मारत आहे. यामुळे प्राणीपक्षीच नाही,तर माणसे सुद्धा घाबरू शकतील.

९ सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच हिट झाला आहे. लोकांच्या यावर मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. काहींच्या मते जर अर्ध्या रात्री हे चित्र शेतात दिसले तर पाहणाऱ्याची परिस्थिती बघण्यासारखी असेल. अनेकांनी आपण हसून हसून लोटपोट झालो असे सांगितले आहे.

तुम्हाला हा भन्नाट जुगाड कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required