computer

मोबाईल हरवला तर यूपीआय खाते कसे ब्लॉक करावे? सर्व टप्पे सोप्या भाषेत समजून घ्या!!

आजकाल स्मार्टफोन वर डिजिटल पेमेंट करणे खूप सोपे झाले आहे. क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड यामुळे पेमेंट करता येतेच, पण पेटीएम, गुगल पे, फोन पे आणि अश्या UPI सेवाही दैनंदिन जीवनात खूप महत्त्वाच्या झाल्या आहेत. स्मार्टफोनमध्ये एकतरी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) ॲप आपण वापरतोच. त्यामुळे कुठेही पैसे देणे किंवा घेणे सोपे होऊन गेले आहे. वेगवेगळी बिल्स भरणे, फी भरणे किंवा दूरच्या मित्राला मदत करणे हे पेटीएम, गुगल पे, फोन पे या सुविधेमुळे खूप सोपे झाले आहे. फोन नंबरवर पैसे पाठवता आणि घेताही येतात. पण हा स्मार्टफोन चोरीला गेला तर? या नंबरवरून कोणीही पैसे काढून घेईल? किंवा यूपीआय अकाउंटचा गैरफायदा करून घेऊ शकतो? म्हणून आम्ही आपले यूपीआय खाते तात्पुरते ब्लॉक कसे करायचे याची माहिती घेऊन आलो आहोत. फोन हरवल्यास तात्काळ हे अकाऊंट ब्लॉक करून तुम्ही तुमची रक्कम सुरक्षित ठेऊ शकता.

पेटीएम खाते तात्पुरते कसे ब्लॉक करावे?

पेटीएम वापरकर्ते पेमेंट्स बँकेच्या हेल्पलाइन नंबर 01204456456 वर कॉल करु शकतात.

त्यात फोन हरवला आहे हा पर्याय निवडा.

दुसरा नंबर लिहून एंटर करा आणि आपला गमावलेला फोन नंबर भरण्याच्या पर्यायावर जा.

सर्व डिव्हाइसमधून लॉग आउट करणे हा पर्याय निवडा.

पुढे, पेटीएम वेबसाइटवर जा आणि 24x7 हेल्प निवडण्यासाठी खाली स्क्रोल करा.

फसवणूकीचा अहवाल द्या (Report a Fraud) निवडा आणि कोणत्याही श्रेणीवर क्लिक करा.

नंतर तिथे कोणत्याही समस्येवर(issue) वर क्लिक करा. खाली message us हे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.

अकाउंट तुमचेच आहे असा एक पुरावा सादर करावा लागेल, हा पुरावा जो डेबिट / क्रेडिट कार्ड स्टेटमेंट असू शकतो. तसेच पेटीएम खात्यातील व्यवहार, पुष्टीकरण ईमेल किंवा पेटीएम खात्याच्या व्यवहारासाठी आलेले sms हेही पुरावे म्हणून तुम्ही देऊ शकता. चोरीला गेलेल्या फोनची पोलिसांत दिलेल्या तक्रारीचा पुरावाही द्यावा लागतो.

हे सगळे झाल्यावर पेटीएम आपले खाते प्रमाणित करेल आणि ब्लॉक करेल आणि याची पुष्टी देणारा मेसेज तुम्हाला येईल.

गूगल पे खाते कसे ब्लॉक करावे?

गुगल पे वापरकर्ते हेल्पलाईन नंबरवर 18004190157 वर कॉल करू शकतात आणि त्यांच्या आवडीची भाषा निवडू शकतात.

समस्या(issue)साठी योग्य पर्याय निवडा.

तिथे एका विशेषज्ञाशी बोलण्याचा पर्याय निवडा,तो आपले Google Pay खाते ब्लॉक करण्यास मदत करेल. वैकल्पिकरित्या Android वापरकर्ते remote wipe their data( डेटा पुसून टाकू ) हा पर्याय निवडू शकतात . जेणेकरून फोनवरून कोणीही आपल्या Google खात्यात प्रवेश करू शकत नाही त्यामुळे Google पे अ‍ॅप मध्येही त्यांना प्रवेश करता येत नाही.

iOS वापरकर्ते सुद्धा remotely erasing data करू शकतात .

त्यानंतर तुमचे अकाऊंट ब्लॉक होते.

फोन पे खाते कसे ब्लॉक करावे?

फोन पे वापरकर्त्यांनी 08068727374 किंवा 02268727374 वर कॉल करणे आवश्यक आहे.

प्राधान्य दिलेली भाषा निवडल्यानंतर, आपल्याला आपल्या फोन पे खात्यासह समस्येची तक्रार नोंदवायची असेल तो योग्य क्रमांक दाबा असे विचारले जाईल.

नोंदणीकृत क्रमांक एंटर करा आणि आपल्याला पुष्टीकरणासाठी ओटीपी पाठविला जाईल. पुढे ओटीपी न मिळाल्याचा पर्याय निवडा.

आपणास सिम किंवा डिव्हाइस गमावण्याचा पर्याय देण्यात येईल, तो निवडा.

त्यानंतर आपण एखाद्या प्रतिनिधीशी संपर्क साधला जाईल. हा प्रतिनिधी फोन नंबर, ईमेल आयडी, अंतिम देय रक्कम, शेवटच्या व्यवहाराचे मूल्य इत्यादी माहिती करून घेईल आणि फोन पे खाते ब्लॉक करण्यास मदत करेल.

तुमचे कुठले अकाउंट आहे? तो नंबर सेव्ह करून घ्या आणि काळजी घ्या. आपल्या मित्र,परिवार यांनाही ही माहिती शेयर करायला विसरू नका.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required