computer

पाकिस्तान, जर्मनी, युके भारताला कोरोना संकटात कशी मदत करत आहेत?

कोरोनाची दुसरी लाट देशात चांगल्याच जोरात आली आहे. जगात सर्वात जास्त केसेस भारतात निघत आहेत. रोजच्या रोज भीषण होत जाणारी परिस्थिती सर्वांना दिसत आहे. देशात सध्या ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसीविर इंजेक्शन यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. म्हणूनच अशा परिस्थितीत जगातील इतर देश भारतासोबत उभे राहिले आहेत. आजच्या लेखातून भारताला कुठल्या देशाने काय मदत केली हे आपण जाणून घेऊया.

१. पाकिस्तान 

पाकिस्तानचे सरकार भारताला पीपीई किट, व्हेंटिलेटर आणि इतर गोष्टी पाठवत आहेत. पाकिस्तान सरकारच्या प्रवक्त्यानुसार, भारताला मदत करण्यासाठी पाकिस्तानकडून एक्स रे मशीन, व्हेंटिलेटर, पीपीई किट पाठवले जात आहेत. तसेच पाकिस्तानातील इधी फाउंडेशन कडून भारताला ५० रुग्णवाहिका पाठविण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे.

२. सौदी अरेबिया

सौदी सरकारने भारताला ८० मॅट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन पाठवले आहे. त्यासाठी अदानी ग्रुपच्या शिपिंग कंपनीची मदत घेण्यात आली आहे. 

३. जर्मनी

जर्मनीने भारतात २३ मोबाईल ऑक्सिजन जनरेशन प्लांट पाठवले आहेत. त्यांचा वापर हा मिलिटरी युनिटमधल्या कोविड रुग्णांसाठी होणार आहे. या आठवड्यात ते येतील अशी आशा आहे.

४. सिंगापूर

सिंगापुरने भारतात ४ क्रायोजिनिक ऑक्सिजन टॅन्कस पाठवले आहेत. ते भारतीय एयर फोर्सद्वारे आणले गेले आहेत.

५. युके

युकेने भारतात ४९५ ऑक्सिजन जनरेटर्स आणि १४० व्हेंटिलेटर पाठवले आहेत. युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या वातावणात शक्य होईल ती सर्व मदत भारताला करणार असल्याचे सांगितले आहे.

 

भारतात कोरोना वाढलेला असताना जगभरातून भारताला मिळणारी मदत सुखावणारी आहे. आपण सगळे मिळून कोरोनाला हरवू शकतो हा विश्वास दृढ होत जातो.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required