computer

इस्रोमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञ/इंजिनियर्सना एवढा पगार मिळतो...

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारताला अवकाशविज्ञानामध्ये नवी ओळख मिळवून दिली आहे. २०१४ सालचं पहिल्याच प्रयत्नात यशस्वी केलेली मंगलयान मोहीम असो किंवा नुकतीच पार पडलेली चांद्रयान-२. काही दिवसापूर्वी  आलेल्या बातमीनुसार लवकरच चांद्रयान-३ मोहिमेवर काम सुरु होणार आहे.

आपण इस्रो म्हणत असलो तरी इस्रो या नावामागे मोठी टीम काम करते. देशासाठी त्यांनी केलेलं काम बघता आपल्याला कधी ना कधी तर नक्कीच प्रश्न पडतो की’ या शास्त्रज्ञांना पगार किती असेल?’

याच कुतूहलापोटी आम्ही  माहिती शोधत गेलो. जी माहिती हाती लागली ती तुमच्या समोर ठेवत आहोत.

इस्रो मध्ये फक्त शास्त्रज्ञ काम करतात हा आधी तर गैरसमज आहे. तिथे शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्स  या दोन्ही शाखेतील लोक काम करतात. दुसरा गैरसमज म्हणजे या लोकांना भरपूर पगार मिळत असेल अशी आपली धारणा असते. ती साफ चूक आहे. इस्रोमध्ये वेगवेगळ्या पदावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञ/इंजिनियर्सना जवळजवळ १.५ लाख ते ६.१२ लाख पर्यंत वार्षिक पगार मिळतो. 

इतर विभागात पदानुसार पगार ठरलेले असतात. उदाहरणार्थ, इस्रोमध्ये काम करणाऱ्या सिव्हील इंजिनियरला २.२० ते ६.१२ लाख पर्यंत वार्षिक पगार मिळतो. मॅकॅनिकल इंजिनियरला १.९१ लाख पासून ते ५.४० लाख पर्यंत पगार असू शकतो. आणखी उदाहरणं जाणून घेण्यासाठी हा आराखडा पाहा :

शास्त्रज्ञ म्हटल्यावर पगाराचा जो आकडा आपल्या डोळ्यासमोर येतो तेवढा मोठा आकडा इथे नाही. साधारणपणे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्याला मिळणारं पॅकेज इस्रोमध्ये मिळतं....पण जर तुम्ही नामांकित आयआयटी कंपनीतून पदवी घेऊन आलेले असाल तर तुम्हाला  सुरुवातीलाच ९ ते १२ लाख पर्यंत वार्षिक पगार देऊ केला जाऊ शकतो.

जाता जाता आम्ही एवढंच सांगू की पगार साधारण असला तरी इस्रो हे नावच एवढं मोठं आहे की तिथे पैसे न बघता समाधान बघितलं जातं. आपण देशासाठी काम करतोय ही भावना तिथे असतेच. सध्या इस्रोमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती होत आहे. या लिंकवर जाऊन अधिक माहिती जाणून घ्या.

https://www.isro.gov.in/careers

सबस्क्राईब करा

* indicates required