computer

फोनमधले फोटो चुकून डिलिट झाले? हा उपाय वापरा आणि फोटो परत मिळवा!!

फोन मेमरी रिकामी करताना अचानक हवे असलेले फोटो किंवा व्हिडीओ पण डिलीट होणे, किंवा एक फोटो डिलीट करताना दुसराच डिलीट होणे हे नेहमी घडत असतं. पण जर तुमच्याकडे गुगल फोटो अॅप असेल तर फिकर नॉट. गुगल फोटोजच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या मोबाईलमधले आणि तुम्ही वेबवर सेव्ह केलेले फोटोज पाहता येतात आणि जर तुमच्या हातून चुकून फोटो डिलीट झाले असतील तर ते पुन्हा मिळवता पण येतात.

आजच्या लेखात आपण डिलीट झालेले फोटो/व्हिडीओ गुगल फोटोजच्या माध्यमातून परत कसे मिळवायचे हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहेत.

१. गुगल फोटोज अॅपवर क्लिक करा. डाव्या कोपऱ्यात असलेल्या hamburger icon वर क्लिक करा. सोप्या शब्दात सांगायचं तर डाव्या कोपऱ्यात ज्या ३ पट्ट्या दिसतायत त्यावर क्लिक करा.

२. यानंतर तुमच्या समोर पर्याय उघडतील. त्यातील Trash/Bin हा पर्याय निवडा.

३. Trash वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिलीट झालेले फोटो/व्हिडीओ दिसतील. तुम्हाला जे फोटो/व्हिडीओ पुन्हा मिळवायचे आहेत त्यांची निवड करून रिस्टोर (Restore) पर्यायावर क्लिक करा.

मंडळी, अगदी याच पद्धतीने तुम्हाला आयफोनवर डिलीट झालेले फोटो/व्हिडीओ परत मिळवता येतील. आता पाहूया गुगल फोटोज वेबच्या माध्यामातून फोटो परत कसे मिळवायचे.

१. गुगल फोटोजच्या https://photos.google.com/ या वेबसाईट वर जा आणि sign in करा.

२. hamburger icon वर क्लिक करा.

३. तुम्हाला हवे असलेले फोटो/व्हिडीओ निवडा, निवड केल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या रिस्टोर बटनवर क्लिक करा. यानंतर तुम्ही निवडलेले फोटो/व्हिडीओ लायब्ररीमध्ये दिसतील.

मंडळी, एक लक्षात असुद्या. गुगल फोटोजमध्ये असलेल्या बॅकअप पर्यायाचा वापर करा. बॅकअप पर्याय वापरल्याने तुमचे फोटो आणि व्हिडीओ कायमचे सेव्ह तर होतीलच पण फोनमधून डिलीट झालेच तर ते सहज परत मिळवता येतील. समजा तुम्ही फोन बदलला तरी या पद्धतीने जुन्या फोनमधले फोटो आणि व्हिडीओ नवीन फोनमध्ये मिळवता येतील.

तर मंडळी, हा गुगल फोटोजचा पुरेपूर वापर करा. पोस्ट आवडली असेल तर शेअर नक्की करा.

सबस्क्राईब करा

* indicates required