बापरे!! एकाच फोटोमध्ये सामावल्या तब्बल १५,००० आकाशगंगा ??

नासाच्या हबल दुर्बिणीने आजपर्यंतचा अवकाशाचा सर्वात मोठा भाग कॅमऱ्यात कैद केला आहे. या एका फोटोमध्ये तब्बल १५,००० आकाशगंगा दिसत आहेत राव! या दुर्बिणीने अल्ट्राव्हॉयलेट व्हिजनचा वापर करून एकाच फ्रेममध्ये हजारो आकाशगंगा टिपण्याचा चमत्कार घडला आहे.

मंडळी, हा फोटो साधा नाही बरं का. तुम्हाला माहित असेलच आपला सूर्य एक तारा आहे. अगदी असाच तारा फोटोत दिसत असलेल्या १२००० आकाशगंगांमध्ये जन्म घेत आहे. याचा अर्थ तिथेही जीवसृष्टी तयार होण्याची शक्यता आहे.

राव, हबल दुर्बिणीच्या अल्ट्राव्हॉयलेट व्हिजनचा वापर करून ११०० कोटी वर्षांपासून तयार होत असलेल्या नव्या सूर्यांचा अभ्यास केला जात आहे. सूर्य आणि त्याची सूर्यमाला तयार होण्याची सुरुवात बिग बँगनंतर (अवकाशातील महास्फोट) म्हणजेच तब्बल ३०० कोटी वर्षांपूर्वी सुरू झाली होती. माणसाला इतर सूर्यमाला आणि त्यांतल्या ग्रहांबद्दल नेहमीच कुतूहल वाटत आले आहे, त्यातल्या किमान काही प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला मिळतील अशी आशा करायला हरकत नाहीय.  

आकाशगंगा (स्रोत)

आपण सर्वदूरच्या आकाशगंगा फक्त इन्फ्रारेड प्रकाशातच पाहू शकतो. पण हबल दुर्बिणीमुळे अनेक प्रकाशवर्ष दूर आकाशगंगाही दिसू शकल्या आहेत. या कामात नासाच्या इतर दुर्बिणींची मदत घेण्यात आली. इन्फ्रारेड, अल्ट्राव्हॉयलेट आणि साधारण डोळ्यांनी दिसणारा प्रकाश यातून निर्माण झालेल्या दृश्याला एकत्रित करून आजवरचं अवकाशाचं सर्वात मोठं दृश्य तयार झालं आहे. अवकाश तंत्रज्ञानात मानवाचं हे एक मोठं पाऊल आहे.

काय आहे ही  हबल दुर्बिणी ??

स्रोत

हबल दुर्बीण युरोपियन स्पेस एजन्सी आणि नासा यांनी संयुक्तपणे १९९० साली अवकाशात सोडली होती. या दुर्बिणीला आतापर्यंतची सर्वात मोठी आणि प्रगत दुर्बीण समजलं जातं. या दुर्बिणीला नासामधून नियंत्रित केलं जातं.

मंडळी, हबल दुर्बिणीने अवकाशातील अनेक नवीन रहस्यं बाहेर पडू शकतात. कदाचित आपल्यासारखाच आणखी एक ग्रहसुद्धा शोधला जाईल. तुम्हांला काय वाटतं??

सबस्क्राईब करा

* indicates required