माणसातली माणुसकी दाखवत आहे माणुसकीची भिंत : नागपूर आणि कोल्हापूर

 दिवाळीच्या निमित्तानं नागपूर आणि कोल्हापूर मध्ये एक आगळावेगळा उपक्रम पहायला मिळतोय,उपक्रमाचं नाव आहे 'माणूसकीची भिंत'!! आणि नावाप्रमाणेच ही भिंत माणसातली माणूसकी दाखवून देत आहे...

२९ आक्टोबरपासून कोल्हापूरात आणि १ नोव्हेंबरपासून नागपूरात या माणूसकीच्या भिंतीचा उपक्रम सुरू झालाय. तुमच्या वापरात नसलेले जुने कपडे, स्वेटर्स, बूट, लहान मुलांचे कपडे, हे सगळं काही तुम्ही इथे जमा करू शकता. आणि ज्यांना त्याची गरज आहे ते गरजू लोक या वस्तू घेऊ्न जाऊ शकतात. कोल्हापुरातल्या सीपीआर चौकात आणि नागपुरातल्या शनी मंदिर, नविन अंडर ब्रिजजवळ हा उपक्रम सुरू आहे आणि तो पुढचे काही दिवस सुरू राहणार आहे.

अपेक्षेप्रमाणे या सामाजिक उपक्रमाला खूपच चांगला प्रतिसाद मिळतोय. कोल्हापुरात सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला आहे. आणि या उपक्रमात 'घेणारे आणि देणारे' अशा दोन्ही लोकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतलाय.

      जर तुमच्याकडे अशा काही गरज नसलेल्या वस्तू आणि कपडे असतील, तर त्या स्वच्छ धुवून तुम्हीही त्या एखाद्या गरजूंला देऊन मदत करू शकता. तर चला मग.. या उपक्रमात सहभागी व्हा आणि आपल्यातल्या माणुसकीचं दर्शन घडवा...

सबस्क्राईब करा

* indicates required