computer

शनिवार स्पेशल : प्लास्टिकबंदीची संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर !!

महाराष्ट्र सरकारने यावर्षी मार्च मध्ये प्लास्टिक बंदीची घोषणा केली होती. त्यासाठी ग्राहकांना आणि विक्रेत्यांना प्लास्टिकला पर्याय शोधण्यासाठी आणि आहे तो प्लास्टिक फेकण्यासाठी ३ महिन्यांची मुदत दिली होती. कालच ती मुदत संपलेली असून सरकारने पूर्णपणे प्लास्टिक बंदीची घोषणा केली आहे.

सरकारने प्लास्टिक व थर्माकोलचा वापर, निर्मिती, वाहतूक व विक्रीवर बंदी आणली होती. कालच संपलेल्या मुदतीनंतर ही बंदी कायम राहणार आहे. पण राव, प्लास्टिक हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. प्लास्टिक पूर्णपणे बॅन करणं कसं शक्य होईल ? मंडळी, यासाठी सरकारने ‘प्रतिबंधित प्लास्टिक’ या वर्गाखाली कोणत्या प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी असणार आहे हे समजावून सांगितलंय.

चला तर पाहूयात प्रतिबंधित प्लास्टिक म्हणजे काय ?

 

१. सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या

२. डिस्पोजेबल वस्तू उदाहरणार्थ, थर्माकोल व प्लास्टिक पासून तयार करण्यात येणारे कप्स, प्लेट्स, वाटी, चमचे, इत्यादी.

३. सजावटीसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक व थर्माकोल. उदा, थर्माकोलचा मखर.

४. द्रव प्रदार्थ साठवण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक. उदा. प्लास्टिक पाऊच, कंटेनर, इत्यादी.

५. पदार्थ पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक.

बंदी नसले प्लास्टिक प्रोडक्ट

१. औषधे पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारा प्लास्टिक. हॉस्पिटल मध्ये लागणारा प्लास्टिक. उदा, सलाईन बॉटल्स.

२. दुध पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारा प्लास्टिक. (५० मायक्रॉनच्या वर)

३. बागकाम व शेतीसाठी लागणारा विघटनशील प्लास्टिक.

४. निर्यातीसाठी लागणारा प्लास्टिक.

५. घनकचरा ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक.

६. निर्मिती प्रक्रियेच्या सुरुवातील वापरण्यात येणारे प्लास्टिक.

प्लास्टिकचा वापर करणाऱ्यास दंड :

पहिल्यांदा कायदा मोडणाऱ्यास ५००० तर दुसऱ्यांदा कायदा मोडणाऱ्यास १०,००० रुपये दंड आकारला जाईल. तिसऱ्यांदा जर कायदा मोडला तर मात्र २५,००० रुपये दंड आणि ३ महिने कारावास सुद्धा होऊ शकतो.

स्रोत

मंडळी प्लास्टिक बंदीचा मुख्य उद्द्येष्य आहे पर्यावरण संरक्षण. पण प्लास्टिक निर्माता, विक्रेता तसेच काही ग्राहक सुद्धा प्लास्टिक बंदीला विरोध करत आहे. प्लास्टिकला पर्याय नसल्याने हा विरोध होतोय. लोकांना अजूनही प्रश्न पडलाय की हे नेमकं शक्य कसं होईल.

मंडळी, बृहन्मुंबई महानगरपालिकेने यावर तोडगा म्हणून ‘प्लास्टिक पर्यायी प्रदर्शन’ भरवलंय. हे प्रदर्शन २२ जून ते २४ जून पर्यंत असणार आहे. महानगरपालिकेकडून या प्रदर्शनाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईकरांना आवाहन करण्यात आलंय.

राव, प्लास्टिकला पर्याय नाही असं म्हणणार्यांना महानगरपालिकेने उत्तर दिलंय. त्याला आता मुंबईकर कशी प्रतिक्रिया देतात यावर सगळं अवलंबून आहे. पण हे तर झालं मुंबईच्या बाबतीत. महाराष्ट्रात इतरत्र कशा प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे हेही महात्वाचं आहे.

स्रोत

प्लास्टिक सारख्या महत्वाच्या गोष्टीपासून मुक्ती मिळवणं तितकस सोप्प असणार नाही हे जरी मान्य केलं तरी प्लास्टिक पासून मुक्तता ही काळाची गरज आहे. पर्यावरणाचा ऱ्हास व एकंदरीत आरोग्याला धोकादायक असलेला प्लास्टिक कमीत कमी वापरण्याची सुरुवात आपल्यापासूनच व्हायला हवी.

प्लास्टिकला पर्याय म्हणून खालील गोष्टी जाणून घ्या.

रोजच्या वापरात येणाऱ्या डस्बिन बॅगला पर्याय जाणून घेण्यासाठी आमचा ‘प्लास्टिकच्या डस्टबीन बॅग्जवर पर्यावरणस्नेही उपाय...’ हा लेख वाचा.

प्लास्टिकबंदीबाबत अधिक माहितीसाठी व प्लास्टिक संकलनासाठी पुढील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा :

मुंबईतील : १८००२२२३५७

ठाणे : ८२९१७३५८९३

नवी मुंबईतील विभाग :

बेलापूर : १८००२२२३१२
तुर्भे : १८००२२२३१४
घणसोली : १८००२२२३१७
ऐरोली  : ८००२२३१८
दिघा : १८००२२२३१९
नेरुळ : १८००२२२३१३
वाशी : १८०२२२३१५
कोपरखैरणे : १८००२२२३१६
महानगरपालिका मुख्यालय : १८००२२२३०९/१८००२२२३१०

पनवेल : ९७६९०१२०१२

बृहन्मुंबई महानगरपालिकेने कापडी व कागदी पिशवी तयार करणाऱ्या व्यवसायांची माहिती दिली आहे. PDF बघा.

 


 

आणखी वाचा :

ठाण्यातले कौस्तुभ ताम्हनकर आपल्या घरात कशी राबवतात शून्य कचरा मोहीम !!

 

सबस्क्राईब करा

* indicates required