computer

व्हिडीओ ऑफ दि डे : या मराठी पोराने ऑस्कर सोहळा गाजवला...त्याचं गाणं ऐका !!

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एमिनेम गाणार म्हणून सगळेचजण आतुरतेने वाट बघत होते. एमिनेम आला आणि त्याने गायलं पण त्यानंतर जे घडलं  ते सगळ्यांसाठीच आश्चर्याचा धक्का देणारं होतं.

एमिनेम नंतर ३६ वर्षांचा भारतीय आणि त्यातही आपल्या महाराष्ट्राचा तरुण रॅपर स्टेजवर आला आणि त्याने रॅप गायला सुरुवात केली. या रॅपरचं नाव आहे उत्कर्ष अम्बुडकर. ऑस्करसारख्या महत्त्वाच्या सोहळ्यात त्याने स्वतः लिहिलेला रॅप गायला आहे. हा व्हिडीओ पाहा.

उत्कर्षने न्यूयॉर्कच्या टिस्क स्कूल ऑफ आर्टमधून २००४ साली अभिनयाचं शिक्षण पूर्ण केलं. गेल्या १६ वर्षापासून तो रॅपींग करतोय. त्याने रॅपींगला एवढं वाहून घेतलंय की अभिनयाचं शिक्षण घेऊनही त्याने अभिनेता म्हणून कधी  काम केलं नाही. न्यूयॉर्कच्या क्लबमध्ये तो नेहमीच फ्रीस्टाईल रॅपींग करताना दिसायचा.

त्याच्या आयुष्याचा काही काळ हा त्याने दारू आणि अंमलीपदार्थांच्या विळख्यातून बाहेर पाडण्यात घालवला. याचवेळी त्याचं नशीब बदलणारी संधी त्याच्याकडे चालून आली. ‘फ्रीस्टाईल लव्ह सुप्रीम’ नावाच्या रॅपींग ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी त्याला आमंत्रण मिळालं होतं. तो वेळीच या ग्रुपमध्ये सहभागी झाला. पुढे त्याने त्यांच्यासोबत कामही केलं. २०१९ साली ब्रॉडवे येथील कार्यक्रमातून त्याला मोठ्याप्रमाणात प्रसिद्धी मिळाली.

उत्कर्षने ‘फ्रीस्टाईल लव्ह सुप्रीम’ ग्रुप सोबत काम तर केलंच पण गेल्या वर्षभरात त्याने दोन अल्बमही रिलीज केले आहेत. कालच्या ऑस्करमधल्या सादरीकरणानंतर तर त्याच्याकडून  भविष्यात चांगल्या कामाची अपेक्षा वाढली आहे. एका भारतीय  माणसाने इतकी मोठी  उंची गाठलेली बघून प्रत्येक भारतीयाला त्याचा नक्कीच अभिमान वाटेल.

सबस्क्राईब करा

* indicates required