आपले सैन्य पहिल्यांदाच करणार भारतीय प्रजातीच्या कुत्र्यांची भरती. मुधोळ हाउंडबद्दल माहिती लगेच वाचा!!

आपल्या लष्करात आजवर फॉरीनचे कुत्रे डॉग स्क्वॉडमध्ये घेत होते म्हणे. ते लोक म्हणे जर्मन शेफर्ड, लॅब्रॅडॉर आणि ग्रेट स्विस माऊंटन डॉग्ज् या जातींचेच कुत्रे सामील करून घेत होते. तर काय मंडळी,  आपल्या देशात सध्या स्वदेशीचे वारे वाहत आहे. त्यात आपल्या लष्करानेसुद्धा देशी कुत्रांना आपल्या डॉग स्कॉडमध्ये घ्यायचे ठरवले आहे.

तर आता ज्या प्रजातीच्या कुत्र्यांची निवड करण्यात आली आहे तिचं नाव आहे मुधोळ हाउंड. मेरठच्या रिमाउंट आणि व्हेटर्नरी सेंटरने मुधोळ हाउंड या जातीच्या सहा कुत्र्यांची ट्रेनिंग पूर्ण केली आहे आणि आता त्यांना सैन्यात भरती केलं जाईल. त्यांची पहिली पोस्टिंग अर्थात जम्मू आणि काश्मीरमध्ये होण्याची शक्यता आहे.

(हे उजव्या बाजूचं पांढऱ्या रंगाचं इटुकलं पिल्लू मोठं होऊन एकदम डेंजरस दिसतं राव!)

काय आहे मुधोळ हाउंडची खासियत?

मुधोळ हाउंडचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याला मिळालेली वेगवेगळी नावं. दख्खनच्या पठारावर याला मुधोळ हाउंड म्हणले जायचे. ब्रिटिशांना शिकारीला हा सोबत करायचा म्हणून त्यांनी याचे नाव कारवान हाउंड केलं आणि आपल्या भारतीयांनी त्याचं नामकरण कारवाणी असं केलं. या जमातीच्या असलेल्या विशिष्ठ शरीरायष्टीमुळे आणि त्यांच्या डोळ्यांच्या युनिक जागेमुळे त्यांना २७०अंशाचा दृष्टिक्षेप मिळतो. म्हणजेच आपल्यापेक्षा यांना दुप्पट क्षेत्र पाह्यला मिळते. भारतीय जमातीच्या कुत्र्यांमध्ये सगळ्यात निरोगी प्रजातीमध्ये त्यांचा समावेश होतो.

या मुधोळ हाऊंडना पाहूनच त्यांचा भेदकपणा लक्षात येतो. उंच लांबलचक पाय  आणि बारीक शरीरयष्टी एखाद्या खेळाडूप्रमाणे त्याला शोभून दिसते. मोठं देखणं जनावर आहे हे!!

मुधोळ हाउंडचा इतिहास

सध्याच्या उत्तर कर्नाटकातला बागलकोट जिल्हा हा  स्वातंत्र्यापूर्वी  मुधोळ संस्थानाचा भाग होता. या संस्थानाचे राजघराणे म्हणजेच श्रीमंत राजेसाहेब मालोजीराव घोरपडे यांनी भारतीय आणि पर्शियन जातीच्या ब्रिडिंगमधून या जमातीची निर्मिती केली होती. राजांनी आपल्या इंग्लंड भेटीत पाचव्या जॉर्ज राजाला एक मुधोळ हाऊंड कुत्र्यांची जोडी भेट दिली होती.  त्याने या प्रजातीची लोकप्रियता अधिक वाढली.

तर मंडळी,  तुमच्याकडे एखादा मुधोळ हाउंड असेल तर त्याचा फोटो आमच्यासोबत लगेच शेअर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required