computer

भारताच्या बास्केटबॉलने एक नवीन उंची गाठली आहे आणि आपल्याला पत्ताच नाही....जाणून घ्या सविस्तर!!

भारतीय क्रीडा क्षेत्र हळूहळू नव्या उंचीवर जाऊ पाहत आहे. ऑलिम्पिकमध्ये विविध खेळांत मिळवलेला विजय याचेच उदाहरण आहे. आता बास्केटबॉल संघाने पण हे सत्य आहे हे सिद्ध केले आहे. 

दर चार वर्षांनी होणारे चषक हे प्रत्येक खेळात किती महत्त्वाचे असतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही. फुटबॉलमध्ये फिफा, ऑलिम्पिक, क्रिकेट वर्ल्डकप तसेच बास्केटबॉल खेळासाठी FIBA आशिया कप खेळवला जात असतो. 

२०२२ साली हा चषक इंडोनेशिया देशात खेळला जाणार आहे. आधी ही स्पर्धा याचवर्षी आयोजित करण्याचे नियोजन होते पण कोरोनामुळे ही स्पर्धा वर्षभर पुढे ढकलली गेली आहे. एकूण १६ देश या चषकासाठी भिडणार असतात. विशेष गोष्ट म्हणजे भारतीय बास्केटबॉल संघ चषकासाठी पात्र ठरला आहे. सलग दहाव्या वेळा भारत या चषकासाठी पात्र ठरला आहे. 

या स्पर्धेत पात्र होण्यासाठी भारताला मोठी कसरत करावी लागली. दोनपैकी एक सामना जिंकत भारताने शेवटी स्पर्धेत धडक मारली आहे. जोगिंदर सिंग या खेळाडूने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे भारताने एक विजय मिळवला आहे. तर भारताबरोबर पात्रता फेरीत असणारा पॅलेस्टाईन बाहेर फेकला गेला आहे. 

१९६५ पासून भारताने आशिया चषकात भाग घेतला असला तरी अजूनही भारताला चषक आणता आलेला नाही. १९७५ साली भारत चवथ्या क्रमांकावर होता ती भारताची सर्वोत्तम कामगिरी होती. तर १९९३ आणि १९९९ साली भारत पात्र देखील ठरला नव्हता. मागच्या चषकात भारतीय संघ पहिल्याच फेरीत बाहेर पडला होता. यावेळी चमकदार कामगिरीची अपेक्षा भारतीय संघाकडून आहे.

 

लेख आवडला असेल तर आपल्या बास्केटबॉलप्रेमी मित्रांना शेअर करायला विसरू नका!!

सबस्क्राईब करा

* indicates required