computer

या भारतीय तरुणाने तयार केलाय जगातला सर्वात हलका उपग्रह...या उपग्रहाचा उपयोग आणि त्याचं महत्त्व समजून घ्या !!

देशात अनेक तरुण हे प्रचंड उत्साही आणि कार्यक्षम असतात. काही ना काही करण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते. यात काही तरुण असे देखील असतात, जे अशा गोष्टी निर्माण करून दाखवतात जे मोठमोठ्या संस्थांमध्ये शिकून देखील अनेकांना जमत नाहीत.

तमिळनाडू येथील एक विद्यार्थी रियासदीन समसुद्दीन याने जगातला वजनाने सर्वात हलका उपग्रह तयार करून दाखवला आहे. या भारतीय तरुणाच्या शोधणे नासाचेही लक्ष वेधले आहे.  एवढे की खुद्द नासाच या उपग्रहांना अवकाशात पाठवणार आहे. चला तर सविस्तर माहिती घेऊया.

हा उपग्रह प्रिंटेड पॉलीथेरीमाईड थर्मोप्लास्टिक पासून बनलेला आहे. रियासदीनची अपेक्षा आहे की, जर हे मटेरियल अवकाशात टिकले तर सोने आणि टायटेनियम सारख्या धातूंचा वापर उपग्रहांच्या निर्मितीत कामी करता येऊ शकतो.

रियासने बनवलेल्या उपग्रहाचे वजन ३३ मिलिग्राम आहे. याचा आकार फक्त ३३ मिलिमीटर आहे. त्याने फेमटो व्हरायटीची सॅटेलाईट व्हिजन सेट १ आणि २ असे दोन उपग्रह तयार केले आहे. हे दोन्ही उपग्रह चौकोर आहेत. प्रत्येक उपग्रहात ११ सेन्सर लावले आहेत. विशेष बाब म्हणजे या उपग्रहांमध्ये लावलेले ११ सेन्सर हे मायक्रोग्रॅविटी म्हणजे शून्य गुरुत्वाकर्षण बलाच्या संशोधनात अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात.

रियास सध्या त्रिची येथील शस्त्र विद्यापीठात शिकत आहे. तो मॅकट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थी आहे. एवढ्या कमी वयात त्याने केलेल्या कामगिरीने मात्र सगळ्यांना त्याचे कौतुक करण्यासाठी भाग पाडले आहे.

देशातील तरुण अशा पद्धतीने स्वतःच्या प्रयत्नांनी नवनवीन गोष्टी निर्माण करत आहेत. ही गोष्ट देशाचे भवितव्य उज्वल आहे, हेच दाखवून देते.

सबस्क्राईब करा

* indicates required